जिल्हापरिषद अध्यक्षपद भिल्ल समाजाला द्या -अहिरे

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आदिवासी भिल्ल समाजाच्या महिलेला देण्यात यावे अशी मागणी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
श्री. अहिरे यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमातीमधील आदिवासी भिल्ल समाजातील महिलेला देण्यात यावे. कारण अद्याप भिल्ल समाजावर अन्यायच झाला आहे अध्यक्ष पदाची सूत्रे भिल्ल समाजाला मिळालेली नाहीत. आणि आता भिल्ल समाजाला अध्यक्ष पदाची संधी असताना इतर पक्षातील दल बदलू लोकांनी पक्षात प्रवेश करून वातावरण बिघडून टाकले आहे. आतापर्यंत भिल्ल समाजाने आपल्याबरोबर प्रामाणिक राहून आपल्याला सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका भिल्ल समाजाने अतिशय प्रामाणिकपणे बजावली आहे. आणि आता जर भिल्ल समाजाला सर्वोच्च पदावर बसण्याची वेळ आली आहे तर आपणही भिल्ल समाजाचा नक्कीच विचार करावा. कारण जिल्ह्यात भिल्ल समाजाची खूप मोठी ताकत आहे आणि या ताकतीच्या जोरावर आजवर भिल्ल समाजाने आपल्या पारड्यात भरभरून मते टाकली आहेत, तेव्हा यावेळी भिल्ल समाजाच्या महिलेला अध्यक्ष पदाची संधी देऊन मा. विखे पाटलांनी भिल्ल समाजाचा बहुमान करावा. इतर पक्षातील लोकांनी सध्या भाजपमध्ये स्वार्थासाठी प्रवेश सुरू केला आहे परंतु आत्तापर्यंत प्रामाणिक असलेल्या भिल्ल समाजावर त्यामुळे अन्याय होणार नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. भिल्ल समाजातही अतिशय होतकरू व शैक्षणिक दृष्ट्या परिपूर्ण अशी महिला उमेदवार आहे. त्यामुळे मा. पालकमंत्र्यांनी आदिवासी भिल्ल समाजातील महिलेलाच प्राधान्य देऊन अध्यक्ष पदाची सूत्रे हाती द्यावीत अशी संपूर्ण जिल्ह्याच्या भिल्ल समाजाची पालकमंत्र्यांकडे मागणी आहे. तरी पालकमंत्री जिल्ह्यातील तमाम भिल्ल समाजाच्या भावनांचा विचार करून आदिवासी भिल्ल महिलेला अध्यक्षपद द्यावे अशी मागणी ज्ञानेश्वर अहिरे यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments