रूई येथे श्री साई सतच्चरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची हभप रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता!

सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

शिर्डी (राजकुमार गडकरी) राहाता तालुक्यातील रुई- कोहकी येथे श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन व श्री साई सतचरित्र पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज व कारवाडी येथील हभप मोहनीराज महाराज लोंढे यांच्या हस्ते या सोहळ्याची उत्साहात सुरुवात झाल्यानंतर बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी ह भ प तुषारजी महाराज शेळके मानोरी यांचे कीर्तन संपन्न झाले.त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी हभप बाळकृष्ण महाराज सुरासे वारी यांचे कीर्तन झाले. तत्पूर्वी या दिवशी दुपारी चार ते पाच या दरम्यान ह भ प संतोष महाराज जाधव यांचे प्रवचन झाले.24 ऑक्टोबर रोजी हभप अरुणजी महाराज दिघे तळेगाव , दिनांक 25 रोजी ह भ प भास्करजी महाराज कोळी ब्राह्मणी, 26 ऑक्टोबर रोजी हभप विकास महाराज गायकवाड,कोहकी , दिनांक 27 ऑक्टोबर रोजी हभप नामदेवजी आप्पा बिलाडे अहिल्यानगर,व दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी हभप तुकाराम महाराज घुगे निफाड यांचे कीर्तन संपन्न झाले. दररोज कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. दररोज सकाळी चार ते सहा काकडा भजन, सकाळी सात ते अकरा श्री साई चरित्र पारायण ,सायंकाळी 5.30 ते 7 या वेळेत हरिपाठ व सात ते नऊ जाहीर हरी किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होत होता. दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी सरला बेटचे मठाधिपतीचे महंत ह भ प रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या  श्री साई चरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली. 
विशेष म्हणजे या सांगता काल्याच्या कीर्तनाचा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी येथे प्रत्यक्षात भेट दिली. त्यांच्या समवेत रूईच्या सरपंच सौ शितल संदीप वाबळे याही होत्या. कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.  या कार्यक्रमाला रुई कोहकी व परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments