शिर्डी (प्रतिनिधी)-
'नवनीत पब्लिकेशन मुंबई' आयोजित ऑल इंडिया नवनीत ड्रॉईंग कॉम्पिटिशन अंतर्गत, शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल (प्राथमिक विभाग) येथे भव्य चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीच्या ७२० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे तीन गटांत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले:
ग्रुप 'ए' (के.जी. ते पहिली): प्रत्युष लासुरे, रुद्रांश मौर्य, सिया लोढा.
ग्रुप 'बी' (दुसरी ते चौथी): काव्या गोंदकर, ऋषिकेश बनकर, श्रेयस रनमाळे, ज्ञानदा देवगुणे, स्वरांजली डांगे, साईश तुरकणे, ईश्वरी गुंजाळ, राजवर्धिनी म्हस्के, वेद कुलकर्णी.
ग्रुप 'सी' (पाचवी ते सातवी): श्रेयस वाणी, मितेश जगधने, सुरभी बनकर, चैतन्य वाणी, अक्षदा खरात, सार्थक राहणे, लावण्या मोरे.
यशस्वी विद्यार्थ्यांना नवनीत पब्लिकेशनतर्फे आकर्षक गिफ्ट हंपर्स देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी कला अध्यापक हेमंत गीते, मुख्याध्यापिका शिल्पा पुजारी, प्र. प्राचार्या स्वप्ना जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. तर स्पर्धा समितीचे सोनिया ठोकळ, वैजयंती गजरे, विजय हाटकर, शेखर पवार, विकास निर्मळ व शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.
विजेत्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे आणि प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments