एच .एस.सी .परीक्षेत टाकळीभानच्या ज्यूनियर कॉलेजचे सुयश



टाकळीभान : रयत शिक्षण संस्थेच्या टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील ज्यूनियर कॉलेजचा एच .एस .सी . मार्च २०२६ परीक्षेत वाणिज्य शाखेचा ९४.७३ टक्के तर कला शाखेचा ६२ .१६ टक्के निकाल लागल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एम .शिंदे यांनी दिली आहे .
        वाणिज्य शाखेमध्ये कु . वैष्णवी दत्तात्रय मुठे या विद्यार्थिनीने ८० .८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक,कु .दिशा भारत गुंजाळ या विद्यार्थिनीने ८०. १७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक ,कु .प्रतिक्षा रोहिदास बिरसणे या विद्यार्थिनीने ७९ .६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे तर कला शाखेमध्ये कु .वैष्णवी बापुसाहेब सपकाळ हिने ६९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, .कु . हुमेरा इमाम शेख या विद्यार्थिनीने ६७ . ६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु . भारती दादासाहेब सावंत या विद्यार्थिनीने ६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे .

   यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे , स्थानिक स्कूल कमिटी सदस्य , सोसायटीचे चेअरमन मंजाबापू थोरात,राहुल पटारे , विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एम .शिंदे , पर्यवेक्षक एस . एस.जरे, प्रा . सुयोग जाधव, प्रा .प्रशांत जुनघरे व शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले आहे .

Post a Comment

0 Comments