महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९७.२३ टक्के



लोहगाव (वार्ताहर): प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी वर्गाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.२३ टक्के तर कला शाखेचा निकाल ९२.८६ टक्के लागला आहे.
एच एस सी बोर्ड परीक्षा २०२६ चा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला असून प्रवरानगर येथील कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपली निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेत अनुक्रमे प्रिया शरद ठोंबरे ८८.१७ टक्के, गायत्री योगेश थेटे ८६.१७ टक्के तर श्रुती प्रकाश पवळ ७८.५० टक्के गुण मिळाले आहेत तर कला शाखेत अनुक्रमे मानसी लक्ष्मण चेचरे ६१.१७ टक्के, सौरभ रोहिदास गरगडे ५५.८३ टक्के तर काजल राजू बर्डे ५४.८३ गुण मिळून प्रथम आली आहेत. 
या यशस्वी विद्यार्थ्यांचे रावसाहेब म्हस्के, अरुण कडू, एकनाथ घोगरे, प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य संजय डुबे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, विभागप्रमुख डॉ. शरद दुधाट, बाबासाहेब अंत्रे यासह सर्व शिक्षक बंधूभगिनी, पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments