रमेश तगरे यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस पदक

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान गावचे भूमिपुत्र सध्या पोलीस सेवेमध्ये ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे हवालदार म्हणून सेवा देत असलेले, डॉ रमेश सिताराम तगरे यांना ठाणे मध्यवर्ती कारागृह विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र पोलीस पदक ठाणे येथील पोलीस अधीक्षक श्रीम. राणी भोसले, संतोष रहाटे सुभेदार ठाणे मध्यवर्ती कारागृह यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. 
     महाराष्ट्र पोलीस सेवेतील कारागृह विभागातील कर्मचारी /अधिकारी यांच्या प्रशंसनिय सेवेबद्दल सन्मान समारंभामध्ये हा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे,

Post a Comment

0 Comments