अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घेतले साई दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी)-
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी चंद्रपूर वरून आलेले नूतन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी शिर्डी येथे येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक धोरण अवलंबण्याचे संकेत दिले.

 प्रसार माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले कि, अहिल्यानगर जिल्ह्याचा सखोल अभ्यास करून गुन्हेगारांना लगाम घालण्यासाठी लवकरच प्रभावी उपायोजना केल्या जातील. कायदा व सुव्यवस्थेबाबत काहीही प्रश्न निर्माण झाल्यास नागरिकांनी थेट माझ्याशी किंवा पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधावा. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यांनी अहिल्यानगर येथे आपल्या पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांचे स्वागत केले. नवीन पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्याकडून जिल्ह्यातील नागरिकांची मोठी अपेक्षा आहे .ते नक्कीच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी प्रयत्नशील राहतील. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments