दिलीप शिंदे
सोयगाव दि.०२-- जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे कुरेशी वाड्यात कत्तली साठी व गोवंश मास विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच दि.०१ मे महारष्ट्र दिनी सकाळी ०८:०० वाजता कुरेशी वाड्यात पोलिसांनी छापा टाकून १० जनावरे ताब्यात घेऊन मांस विक्री करणाऱ्यांवर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             याबाबत सविस्तर माहिती अशी , जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे कुरेशी वाड्यात कत्तली साठी जनावरे आणल्याची व गोवंश मांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पहुर पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रमोद कठोरे, पीएसआय नंदकुमार शिंब्रे, भरत दाते, गणेश सुस्ते, एएसआय राजेंद्र परदेशी, दिपक सुरवाडे, योगेश सुतार, विलास चव्हाण, मनोज बाविस्कर, उददल चव्हाण, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर ढाकरे, नरेश घाडगे, प्रशांत बडगुजर, राहुल पाटील, राहुल जोहरे, जिवन चव्हाण, गजानन पाटील, संदीप धनगर , राजश्री मोर्य, मनिषा चौधरी आदींनी कसाई वाडा येथे दि.०१ शुक्रवारी सकाळी आठ वाजता छापा टाकून कत्तलीसाठी आणलेली १० जनावरे ताब्यात घेउन मास विक्री करणा-या आरोपींना ताब्यात घेतले असुन आरोपींवर पहुर पोलीस ठाण्यात अप क्र. ११६/२०२६ कलम - ३२५, भा.न्या.सं. सह क-३- क,९- अ महा. प्राणी संरक्षण अधी व इतर प्रमाणे गुन्हा दाखल असुन आरोपी शेख जमीन शेख लतीफ वय-४८ वर्षे रा. शेंदुर्णी ता.जामनेर, सलमान शेख शिकलकर वय-२० वर्ष रा. सोयगाव जि.छत्रपती संभाजीनगर,कुरेशी अफताफ अब्दुल रफिक ऊर्फ अलताफ शेख वय २५ वर्ष रा. शेंदुर्णी ता. जामनेर जि. जळगाव यांना न्यायालयाने दि. ०४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. इतर मांस विक्री करणा-या आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक नंदकुमार शिंब्रे करीत असुन सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे, अपर पोलिस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधीकारी बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.