स्वातंत्र्यदिनीच ज्येष्ठ कलावंत शाहीर गजमल इंगळे यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक,कारवाईची मागणी ---




दिलीप शिंदे
सोयगाव दि.१७-- सोयगाव तालुक्यातील गलवाडा (अ) येथे दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस ग्राम पंचायत कार्यालयात उत्साहात साजरा करीत असतांना ७० वर्षीय ज्येष्ठ कलावंत शाहिराला ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने ज्येष्ठ कलावंत शाहीर यांनी दि.१७ सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.
     याबाबत सविस्तर माहिती अशी, गलवाडा (अ) येथील रहिवासी ज्येष्ठ कलावंत शाहीर गजमल नारायण इंगळे वय ७० वर्षे हे ग्राम पंचायत कार्यालय येथे स्वातंत्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमादरम्यान गावातील उपस्थित असलेल्या सर्वांना गुलाल लावण्यात आला मात्र ग्रामसेवक व ग्रामपंचायत चा कर्मचारी यांनी मला गुलाल न लावता मला अपमानास्पद वागणूक दिली यामुळे मी व्यथित झालो आहे. एका कलावंत शाहिराचा स्वातंत्र्य दिनी अपमान केल्याने याची चौकशी करून कारवाई करावी व असे कृत्य करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी शाहीर गजमल इंगळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
--------------------------------------------------------------------------------
 प्रतिक्रिया:- संबंधित कर्मचाऱ्यास नोटीस काढण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करून कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

                           सत्यनारायण पुल्लेवाड, ग्रामसेवक 
                                 ग्राम पंचायत गलवाडा

Post a Comment

0 Comments