राजुरी (वार्ताहर )विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वाचन संस्कृती जोपासण्याने गरजेचे असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याचे नेत्र तज्ञ डॉ सुंदर गोरे यांनी केले आहे. राहता तालुक्यातील राजुरीच्या माध्यमिक विद्यालयास नोबेल मेडिकल फाउंडेशन अहिल्यानगर यांच्या कडून ग्रंथालय भेट दिले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
राजुरी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या श्री यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास अहिल्यानगर येथील नोबेल फाउंडेशनच्या वतीने १ लाख २० हजार रुपये किमतीचे ग्रंथालय भेट देण्यात आले.राजुरी विद्यालयाच्या मागणीनुसारआवश्यकते प्रमाणे वेगवेगळे वैज्ञानिक,ऐतिहासिक बालचरित्र,तसेच वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चरित्राचे अशा वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारेव विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रेरणादायी ठरणारे पुस्तके डॉ सुंदरदास गोरे नेत्रतज्ञ अहिल्यानगर यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने अत्याधुनिक ग्रंथालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी श्री यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मारुतीराव गोरे ,राजुरी गावचे लोकनियुक्त सरपंच सौ संगीता जालिंदर पठारे,पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे संचालक व उपसरपंच डॉ सोमनाथ गोरे,प्रवरा सहकारी बँकेचे तज्ञ संचालक एडवोकेट सोपानराव गोरे पाटील, श्री यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे प्राचार्य संदीप घोंडे, मेजर रमेश रोकडे, राजुरी सोसायटीचे माजी चेअरमन अशोकराव गोरे,राजुरीचे पोलीस पाटील रावसाहेब गोरे यांच्यासह या कार्यक्रमास राजुरी येथील ग्रामस्थ महिला शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments