गणरायाची स्थापना होऊनही वरुणराजाची प्रतीक्षा कायम; भऊर परिसरातील शेतकरी चिंतेत



भऊर - वैजापूर तालुक्यातील भऊर परिसरात बैलपोळ्याला हलका पाऊस झाला, त्यामुळे गणेशोत्सवात चांगला पाऊस होईल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र श्री गणेशाची स्थापना होऊनही वरुणराजाने दडी मारली आहे.
ऐन तोंडावर आलेली सोयाबीन, कापूस, मका आदी पिके पाण्याअभावी सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रोज ढगाळ वातावरण व पावसासदृश स्थिती दिसते, पण प्रत्यक्ष पाऊस होत नसल्याने चिंता वाढली आहे. हवामान तज्ज्ञांनीही १२ सप्टेंबरपासून पावसाचे संकेत दिले होते, तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे

Post a Comment

0 Comments