पीक विमा नाकारल्याने शेतकऱ्यांचा एल्गार! नेवासे तहसील कार्यालयावर भजन-ढोल बजाव आंदोलन



 टाकळीभान प्रतिनिधी - नेवासे तालुक्यातील अकराही मंडळांमध्ये मागील वर्षीच्या अतिवृष्ट पीक विमा नाकारल्याने शेतकऱ्यांचा एल्गार! नेवासे तहसील कार्यालयावर भजन-ढोल बजाव आंदोलन
        नेवासे तालुक्यातील खरीप २०२५ पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत कापूस, तूर, बाजरी, कांदा यासारखी नगदी पिकांचा पीक विमा नाकारण्यात आलेला आहे.


 या पार्श्वभुमीवर नेवासे तालुका शेतकरी संघटनेने तहसिल कार्यालयावर मंगळवार (दि. १५) सप्टेबर रोजी भजन व ढोल बजाव आंदोलन करुन तहसील कार्यालय दाणाणून सोडले होते.
      नेवासे तालुक्यातील अकराही मंडळांमध्ये मागील वर्षीच्या अतिवृष्टीने सर्वच खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र केवळ सोयाबीन पिकाचाच पीक विमा देऊन इतर सर्व उत्पादकांना एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने तोंडाला पाने पुसलेच्या रोष व्यक्त करत शेतकरी संघटनेने आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला.
    या सर्व पिकांचा पीक कापणी प्रयोगाअंतर्गत शासकीय कर्मचार्‍यांकडून गेलेल्या चुकीच्या वाढीव आकड्यांमुळे आणि उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या चुकीच्या निकषांमुळे पीक विमा नाकारण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विधिज्ञ अजित काळे यांनी करत तहसील कार्यालय आणि कृषी कार्यालय तसेच पंचायत समितीच्या कार्यालयातील त्रिसुत्रीय समितीच्या अहवालाची चौकशी लावण्याची मागणी नेवाशाचे तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्याकडे केली.
     नेवासे तहसीलदारांनी व तालुका कृषि अधिकारी धनंजय हिरवे यांनी त्वरित कार्यवाही करत पीक कापणी प्रयोगाच्या अहवालाची त्रिसूत्रीय समितीची चौकशी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे लावली गेलेली संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश आलेले आहे. यावेळी बोलतांना विधिज्ञ अजित काळे म्हणाले की, शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी पीक विम्याच्या हप्त्यापोटी भरलेली रक्कम आणि वितरित केलेली रक्कम यामध्ये फार मोठी तफावत आढळत आहे. मागील वर्षीच्या उंबरठा उत्पन्नाच्या वाढीव चुकीच्या अहवालामुळेच नेवासे तालुक्याचा पीक विमा रद्द झालेला आहे.
      या व्यक्तीरिक्त उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचे निकष हे अयोग्य असल्याने त्याचा सुद्धा आपण पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी बोलतांना विधिज्ञ काळे यांनी यावेळी बोलतांना सांगितले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर आणि तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे यांनी केले ढोलताशे आणि भजनी मंडळाचे नेवासे तहसील कार्यालयात दिवसभर आंदोलन सुरूच होते. यावेळी बोलताना युवाध्यक्ष डॉ. रोहित कुलकर्णी यांनी मागील सात वर्षाच्या उंबरठा उत्पन्नाच्या आकडेवारी बरोबरच खरीप हंगाम २०२५ च्या आकडेवारीची विमा कंपन्यांच्या सूत्रानुसार कशी गडबड केली जाते हे आंदोलनामध्ये समजावून सांगत तसेच सोयाबीनचे अतिवृष्टीने झालेले नुकसान तर कपाशी, तूर आणि इतर पिकांचे होत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
      यावेळी शेतकरी संघटनेचे ढोलताशे आणि भजन या आंदोलनामुळे मंगळवारी तहसील कार्यालय परिसर या आवाजाने निनादून गेलेला होता आणि शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांना पक्का घाम फुटल्याचे दिसून आले. या चौकशीनंतर येणाऱ्या अहवालाचा आधार घेऊन शासनाकडे पिकविमा नुकसान भरपाई मागण्यात येणार आहे. यानंतरही दाद न मिळाल्यास शेतकरी संघटना न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
      या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर,तालुकाध्यक्ष अशोक काळे,उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे,युवाध्यक्ष डॉ.रोहित कुलकर्णी, बंडोपंत चौगुले,प्रा.कार्लस साठे, विधिज्ञ ज्ञानेश्वर शिरसाठ, बाळासाहेब कावळे, दिलीप पवार, वंचित बहुजन आघाडीचे विजय गायकवाड, किरण लंघे, भाऊसाहेब काळे, हनुमंतराव वाकचौरे, वसंत काका शेरकर, डॉ.कोकणे, दादासाहेब नाबदे, भाऊसाहेब तऱ्हाळ, कृष्णा यादव, अशोक नागोडे, भास्कर तुवर, कैलास पवार, दत्तात्रय निकम, ताराचंद लोढे, त्र्यंबक भदगले, सिताराम काकडे, मनोहर मतकर, परवेज शेख, हरिभाऊ जगताप, सुजित बोडखे, खंडेराव सरोदे, सचिन वेताळ, बापूसाहेब गोरे, सतीश नाईक, अंकुश शिंदे, राजूभाई शेख, सुधाकर नाना देशमुख, सागर लांडे,संजय नागोडे, अनिल साळुंके, दिघी येथील भजनी मंडळी चंद्रकांत गवळी, आबासाहेब बांदल, बापुसाहेब औताडे, बापूसाहेब नागोडे, चव्हाण महाराज, सोमनाथ औताडे, विजय निकम, अरुण भक्त, संजय नागोडे, कृष्णा साळुके, आबासाहेब बादल, अशोक औताडे, रामकृष्ण तुवर, विजय शिंदे, गंगाधर टेमक, जगन्नाथ मतकर, ज्ञानदेव नजन, सोमनाथ राऊत, अमोल गुळवे, सुभाष आचपळे, शेषराव गव्हाणे, रमेश टेमक, रमेश गोर्डे, माऊली तुपे, सतिष फटांगरे, संतोष नरोडे, बाळासाहेब पवार आदिंसह मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments