सोयगाव दि.१७-- सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारात शेतात बैलजोडीने कपाशी वखरत असताना बैलाला विजेच्या तारेचा धक्का लागून कोसळताच सिताराम राठोड या शेतकरी मजुराने जीव धोक्यात घालून बैलाला दुसर सहित काही क्षणात ओढल्याने तिघांचा जीव वाचल्याची घटना दि.१७ गुरुवारी सकाळी अकरा वाजता घडली.
सिताराम मोतीलाल राठोड वय ४६ वर्षे व मोतीलाल हरसिंग राठोड वय ६० वर्षे दोघे रा. वरसाडा ता.पाचोरा हे वरसाडा येथील द्वारकाबाई धर्मा पवार यांचे सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारात गट क्रमांक १२६ मध्ये शेती असून त्यात कपाशी हे पिक लावलेले आहे. बैलजोडीसह दोघे बाप बेटे हे कपाशी पिकात वाढलेले तण वखरत असताना शेतात असलेल्या विजेच्या खांबाला ताण दिलेल्या तारेला बैलाचा धक्का लागताच बैल तारेजवळ कोसळला क्षणाचाही विलंब न लावता सिताराम राठोड या मजूर शेतकऱ्याने जीवाची पर्वा न करता दुस्सर सह बैलाला ओढले लाकडी दुस्सर असल्याने बैलजोडी सह दोघा बाप लेकांचा जीव वाचला आहे. जखमी बैलावर उपचार करण्यात आले आहे. मात्र शेतात लोंबकळत असलेल्या तारा केंव्हा सरळ केल्या जातील हे मात्र निरुत्तरित आहे.अशा घटनांमध्ये जीवित हानी झाल्यास संबंधित यंत्रणेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे प्रीतम बडगुजर या शेतकऱ्याने प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
0 Comments