राहुरी (प्रतिनिधी) : ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाचे प्रश्न माध्यमांच्या बाहेर फेकले गेले जात असल्याचे वास्तव आहे. सर्वसामान्य, गोरगरीब वंचितांना आधार हा ग्रामीण पत्रकारांचा वाटतो. लोकशाही राष्ट्रात आज विरोधी पक्षाची भूमिका ग्रामीण पत्रकारच बजावत आहे. गोरगरीब जनतेचा आवाज ग्रामीण पत्रकारांमधून दिसतो आहे. वावटळीत दीवे लावण्याचे खडतर काम आज या पत्रकारांमधून होताना दिसत आहे. हाच खरा लोकशाहीचा जयजयकार असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत हनुमंत पवार यांनी केले.
निर्भय, युवा ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा शाखा अहिल्यानगरचा स्नेह मेळावा तालुक्यातील चिंचोली या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चिंचोलीच्या सरपंच सौ. शोभाताई लाटे होत्या. व्यासपीठावर प्रभावतीताई घोगरे, कोल्हारचे सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले, वंचितचे बाळासाहेब जाधव, चैताली हारदे, सचिन चौगुले सह मान्यवर उपस्थित होते.
हनुमंत पवार पुढे बोलताना म्हणाले, गतकाळात वृत्तपत्रे सर्वसामान्यांचा आवाज राहिल्याचे दिसते मग तो पंढरपुरचा दलितांना मंदिर प्रवेश सत्याग्रहासह समकालीन सर्वच सत्याग्रह वृत्तपत्रांच्या पाठिंब्यानेच यशस्वी झाले. राष्ट्रबांधणीचे कार्य त्यावेळी वृत्तपत्रांनी केले. तो ठसा कमी अधिक प्रमाणात आजही दिसतो. म्हणूनच सर्वसामान्यांना प्रिंट माध्यमांवरचा विश्वास अढळ आहे. ग्रामीण पत्रकारांच्या मेळाव्यातून ग्रामीण भागातील प्रश्न व्यवस्थेसमोर मांडणे अपेक्षित आहे. ग्रामीण महाराष्ट्र माध्यमांमध्ये यायला दुष्काळ पडावा लागतो. सर्वसामान्यांच्या प्रश्नाला आज जागा मिळत नाही. कष्टकरी, शेतकरी, वंचितांच दुखणं माध्यमांच्या बाहेर पडल्याचे चित्र आहे. धार्मिक नि चिखलफेक विषय हाताळण्यात ऐवजी ग्रामीण प्रश्नांविषयी आवाज उठविण्याचे काम पत्रकारांनी करायला हव. सत्याची बाजू घेवून जाणे पत्रकारांचे काम तर सर्वसामान्यांचा आधार होण्याचे काम पत्रकारांमधून व्हायला हवे. राजकीय क्षेत्र बिघडले आहे म्हणूनच सर्वांचा विश्वास आता पत्रकारांवरच आहे. पत्रकारच हा विरोधी पक्षाची भूमिका बजावू शकतो. निर्भयपणाच बाळकडू पत्रकारांनी जनतेला देण्याची गरजही त्यांनी व्यक्त करत, लोकशाहीच्या तीन खांबांना सर्व प्रकारचे संरक्षण आहे. मात्र ज्यावर लोकशाही मुल्ये जपण्याची खरी जबाबदारी आहे तो चौथा खांब असुरक्षित असल्याचे विदारक वास्तव आहे.
प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रातून ज्येष्ठ शिक्षिका मानाक्षी पाळंदे, वैद्यकीय क्षेत्रात डाॅ. प्रेरणा सुरेंद्र काळे, विधी क्षेत्रात ज्येष्ठ विधिज्ञ मुजीबभाई शेख, वायरमन संदीप फुलवर यांना प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशोक करडे यांची समाजकार्य संघाच्या जिल्हाध्यक्षपदी तर ॲड. नदिम शेख यांची कायदा सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हासचिव राजेंद्र म्हसे, राहुरी तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक, राहाता तालुकाध्यक्ष सुभाष कोंडेकर, नेवासा तालुकाध्यक्ष सचिन कुरुंद, संगमनेर तालुकाध्यक्ष सचिन जंत्रे, पारनेरचे शरद रसाळ, नगर शहराध्यक्ष अशोक तांबे, दिनेश गायकवाड, रमेश जाधव, राजेंद्र पवार, गणेश हारदे, दिपक मकासरे, आप्पासाहेब मकासरे, राजेंद्र परदेशी, म्हैसगावचे सरपंच शिवाजी बर्डे, उपसरपंच नामदेव दुधाट, काकडे, वसंत भोसले, अरुण बोरुडे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, अभियंता शिरीष गायकवाड, प्रा. पोटे. ॲड. प्रसाद सांगळे, पँथरचे जिल्हाध्यक्ष राजू आढाव, निखिल भोसले, शुभम वाघमारे, सुनील लाटे, प्रतीक देशमुख, अक्षय भोसले मुख्याध्यापक मगरे, संतोष ठोंबरे सह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन रमेश जाधव यांनी केले.
0 Comments