दिलीप शिंदे
सोयगाव, दि.२१-- सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुमन हॉस्पिटल सिल्लोड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान श्रीगणेशा आरोग्याचा हे आरोग्य अभियान राबविले जात आहे.
ओयाच अभियानांतर्गत दि. २२ मंगळवारी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी ०९:०० ते ०२:०० यावेळेत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, कामगार आणि गरजू रुग्ण अशा १४० जणांनी आरोग्य तपासणी करिता सहभाग नोंदवला होता. सुमन हॉस्पिटल चे डॉ.निलेश मिरकर, डॉ. गोडसे, डॉ. सिरसाठ यांनी १४० जणांची आरोग्य तपासणी केली. आरोग्य शिबिर यशस्वितेसाठी दिनेश मिरकर व अन्य सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments