शिर्डी (प्रतिनिधी): सध्या जीवनावश्यक वस्तूंचे दर खूपच वाढले असून सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे त्यामुळे या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी शासनाने त्वरित प्रयत्न करावेत अशी मागणी करणारे निवेदन नुकतेच ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने राहता तहसीलदारांना देण्यात आले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष: मा. श्री. दादाभाऊ केदारे, (उपभोक्ता संरक्षण समिती) यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. भगवान थोरात, ग्राहक (उपभोक्ता संरक्षण समिती) यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुका कार्यालयात तहसीलदार श्री. हेमंत पाटील यांना हे निवेदन देण्यात आले.
देशात व राज्यात जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीच्या बाबत आपण विचार केला असता सध्या प्रचंड प्रमाणात महागाई वाढत चालली आहे. प्रत्येक जीवनावश्यक वस्तू यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवासह सामान्य माणसाची फसवणूक होत आहे . सर्वसामान्य माणूस त्यामुळे मेटाकुटीला आला आहे.बाजारपेठेत कडधान्य, खाद्यतेल, तांदूळ, धान्य, गॅस सिलेंडर, भाजीपाला, बियाणे खते, कीटकनाशके याच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक ,मजूर, शेतकरी बांधव यांची कंबरडे मोडले आहे. तसेच व्यापारी वर्गाच्या साठेबाजी व काळाबाजार या कृत्याने जीवनावश्यक वस्तूची टंचाई निर्माण झाली आहे . हे एक दरवाढीचे कारण निर्माण झाल्याचे दिसून येते. सामान्य माणसाचे उत्पन्न वाढत नसल्यामुळे व दररोज जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत असल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक हिताचे रक्षण व रास्त भावात वस्तू
मिळवून देणे आवश्यक आहे. तेव्हा जीवनावश्यक वस्तूच्या किंमती कमी करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करावी.
जीवनावश्यक वस्तूंचे दर सामान्य जनतेच्या आवक्यात आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
सर्वसामान्यांच्या या जिव्हाळ्याच्या आणि गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा. लवकरात लवकर योग्य पावले उचलले गेले नाहीत तर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा या निवेदनात देण्यात आला असून
राहाता तालुका तहसीलदार कार्यालयात तहसीलदार श्री. हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी अँड रामनाथ सदाफळ, पत्रकार रवींद्र जगताप, पत्रकार भगवान थोरात, पत्रकार मुस्ताक अली भाई शहा, दिनकर साळवे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments