कर्मवीर अण्णांनी प्रतिकूल परिस्थितीत स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील आज झाली आहे सर्वात मोठी शिक्षण संस्था--ऍड संदीप गोरक्षनाथ वर्पे

शिर्डी (प्रतिनिधी)-
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दिंन ,दलित, बहुजन व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेची डॉ. कर्मवीर अण्णांनी स्थापना केली. अशी ही शिक्षण संस्था आज आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था झाली आहे. या शिक्षण संस्थेने जणू निम्मा महाराष्ट्र घडवला असून असे म्हणणे अतिशोक्ती ठरणार नाही. असे सांगत आजही सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत व शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या कौन्सिल कमिटीचे चेअरमन . संदीप गोरक्षनाथ वर्पे यांनी केले आहे. 
सावळी विहीर बुद्रुक न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांची 139 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रथम गावातून डॉ.कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची मिरवणूक ढोल ताशा, लेझीम पथकाच्या निनादात व कर्मवीर अण्णांच्या जयजयकारात काढण्यात आली. त्यानंतर जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर कार्यक्रम स्थळी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेमध्ये जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेते खेळाडू व शाळेतील गुणवंत विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विजयराव कडू, प्रा. हनुमंत माने, सरपंच ओमेश जपे, उपसरपंच दत्तात्रय आगलावे, कृ. उ. बा. समितीचे संचालक शांताराम जपे, किरण आगलावे, गणेश कापसे, संतोष आगलावे, कैलास सदाफळ, विकास जपे, राजेंद्र आगलावे, राजेंद्र गडकरी, पोलीस पाटील सौ.सुनीता वाघमारे, मुख्याध्यापक अनिलराव बनसोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ते प्रा. हनुमंत माने यांनी म्हटले की, कर्मवीर अण्णांनी गोरगरीब, वंचित समाजासाठी आपला देह झिजवला. मान, सन्मान, स्वाभिमान अण्णांनी राखत मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत बहुजन समाजाची मुले शिक्षण प्रवाहात यावी म्हणून हा शिक्षण प्रवाह निर्माण करण्याचं मोठं काम केलं. आज रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक उद्योजक, राजकीय क्षेत्रातील नामवंत, गुणवंत असे व्यक्तिमत्व आपापल्या क्षेत्रात ठसा उमटवत आहेत. असे सांगत कर्मवीरांचे विचार पोहोचवण्याचे काम आज रयत सेवक करत आहेत‌ .अशीच शिक्षणाची ही गंगा तळागाळापर्यंत अहोरात्र पोहोचवण्याचे काम रयत सेवक व शिक्षण प्रेमी करत राहतील अशी अशा व्यक्त करत कर्मवीर अण्णांच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केले. यावेळी बाळासाहेब जपे यांनी या शाळेत पाचवीत प्रवेश करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयांसाठी वह्या मोफत देण्याची घोषणा केली. तर सरपंच ओमेश जपे यांनी शाळेला यापुढेही ग्रामपंचायत मदत करत राहील. असे आश्वासन दिले. तर उद्योजक विजयराव कडू यांनी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना शूज देण्याचे जाहीर केले. ‌ या कार्यक्रमाला सोमनाथ आगलावे, राजू वाघमारे, सतीश वाघमारे ,संदीप विघे, किरण जपे, शिवाजी आगलावे, नवनाथ जपे, रावसाहेब आगलावे, भारत आगलावे, सोमनाथ आगलावे, सोपानराव पवार, आदी सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी,मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार कानडे मॅडम यांनी मांनले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments