टाकळीभान येथे शेतात काम करत असताना महिलेवर बिबट्याचा हल्ला महिला जखमी... सुदैवाने वाचली


दिलीप लोखंडे 

 टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान शिवारातील बिबट्याने महिला मजुरावर अचानक हल्ला केल्याने त्यामध्ये महिला व तेथील शेतात काम करणारे मजूर बाल बाल बचावले. यामध्ये महिला जखमी झाली असून उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले.
          याबाबत सविस्तर माहिती अशी की, टाकळीभान सैनिक प्लॉट रोडला विठ्ठल मंदिराचे पुरोहित राजेंद्र देवळलाकर यांची शेत जमीन असून त्यांच्या शेतामध्ये मजूर पती पत्नी पिकाला रासायनिक खत टाकत असताना अचानकपणे बिबट्याने महिलेवर हल्ला केला. यामध्ये महिला संगीता अशोक गांगुर्डे (वय ४०) तिच्या पायाला बिबट्याचा पंजा लागून ती जखमी झाली. परंतु प्रसंगावधान साधून या दोघांनी जोराचा आरडा ओरडा केला,त्यामुळे बिबट्याच्या तावडीतून त्यांनी सुटका करून घेतली. बिबट्याच्या अचानक हल्ल्यामुळे महिला भयभीत होऊन तिचा बीपी वाढला. बिबट्याच्या हल्ल्यातून सदर दांपत्य वाचले. टाकळीभान परिसरात या बिबट्यांच्या वावरामुळे शेतात काम करणारे शेतकरी व मजूर यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्यास जेर बंद करावे अशी मागणी तमाम शेतकरी बांधवातून केली जात आहे. याप्रसंगी सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन फॉरेस्ट कर्मचारी आयुष्यमान बढे, विलास डगळे, राहुल,कानडे यांनी घटनेची पाहणी करून माहिती घेतली महिलेस प्रथम उपचारासाठी दवाखान्यात नेले व उपचार केले

Post a Comment

0 Comments