दिलीप शिंदे
सोयगाव दि. २२--- श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोयगाव शहरात पोलिस प्रशासनाच्या वतीने रूटमार्च काढण्यात आला. आगामी विसर्जन मिरवणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा रूटमार्च घेण्यात आला. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित काईगडे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रूटमार्चचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून संचलन केले.या रूटमार्चमध्ये एसआरपीएफचे एक अधिकारी व २६ कर्मचारी, स्थानिक पोलिस दलातील एक अधिकारी व १५ कर्मचारी, तसेच १८ होमगार्ड जवान सहभागी झाले होते. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
0 Comments