दिलीप शिंदे
सोयगाव दि.२१-- मराठवाडा आणि खान्देशच्या सीमारेषेवर असलेल्या माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२१ सोमवारी गोशाळेत २२१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरणाचा समतोल राखावा ऑक्सिजन निर्मिती व्हावी.यासाठी झाडांची मोठी गरज आहे.झाडे लावा.. झाडे जगवा.. उपक्रम त्याच अनुषंगाने सर्वाधिक आयुष्य असणारे वटवृक्ष वड, कडुलिंब,पिंपळ,बेल,शिसम,अशोक वृक्ष,करंज,क्षमीपत्र आदी.वृक्षाची लागवड करण्यात आली या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सामाजिक वनीकरण अधिकारी विजय सपकाळ, समाधान धनवई, माता पिता गोशाळा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मनोज गायकवाड, वृक्षारोपण कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर गरुड,माजी सरपंच वसंत बनकर,राजेंद्रसिंग देशमुख, पत्रकार राजू ठाकूर, पत्रकार दिपक पाटील, पत्रकार संदीप इंगळे,राजेंद्र महाजन,प्रितम बडगुजर,राजेंद्र गायकवाड,योगेश उमाळे,रोहिदास महाराज, रविंद्र देशमुख, जितेंद्र देशमुख, शिवाजी पाटील,अमोल पाटील,निलेश पाटील,लोटन कुंभार, बाजीराव गिते, संतोष पाटील, निलेश जोशी,संजय चौधरी,दिनेश बडगुजर,छोटू सोनवणे, डॉ.गौरव जोशी,गोरख पाटील आदीं उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐ.के.पाटील यांनी केले तर आभार दिनेश गायकवाड यांनी मानले.
0 Comments