भारतीय मनुष्य हा उत्सव व उत्साह प्रिय आहे. हे लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूपात गणेश उत्सव सुरू केला. आज मोबाईलच्या युगात या उत्सवाचे महत्व खूप वाढत आहे. अशा या उत्सवाला विधायक वळण असलं तर नक्कीच चांगलं घडू शकतं. हे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचं जिवंत उदाहरण आहे. त्याच अनुषंगावर शिर्डीचे श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेला चेअरमन विठ्ठलराव पवार व सर्व संचालक मंडळाने एक चांगलं वळण दिलं आहे. त्यामुळे संस्थेची प्रगती होत आहे. या संस्थेची अशीच प्रगती व भरभराट होत राहून सर्वसामान्य सभासदांपर्यंत त्याचा लाभ जावो , अशी शुभेच्छा ज्येष्ठ पत्रकार सतीशराव वैजापूरकर यांनी व्यक्त केली.
श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कर्मचारी गणेशोत्सव मंडळाची शनिवारी सायंकाळची आरती काही मान्यवर पत्रकार व पोलीस अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आली. आरतीनंतर उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार व पोलिस अधिकारी यांचा सोसायटीच्या वतीने शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व्हा.चेअरमन पोपटराव कोते, संचालक मिलिंद दुनबळे, रंभाजी गागरे, सर्व संचालक, अधिकारी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार किशोर पाटणी म्हणाले की, विठ्ठलराव पवार व संस्थेच्या सर्व संचालकांनी या सोसायटीला चांगले वळण दिले. सोसायटीची साईज्योत इमारती च्या नावाखाली त्यांनी खूप संघर्ष केला. हे मी स्वतः पाहिले आहे. त्यांनी आता साई ज्योत इमारतीचा जणू राम सेतू बांधला आहे. तो ते त्यांच्या कालावधीत पूर्ण करतात की काय! याकडेच या संस्थेच्या सभासदांचे लक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. व त्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार राजेंद्र गडकरी यांनीही संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार व संचालक मंडळाच्या व संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नातून संस्थेची प्रगती, विकास होत असून यापुढे या संस्थेचा अधिकाधिक विकास होत राहो,असे गणराया चरणी प्रार्थना केली. व शुभेच्छा दिल्या. पत्रकार जोशी यांनी यावेळी शुभेच्छा देताना सांगितले की, या सोसायटीत चेअरमन विठ्ठलराव पवार व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रांतिकारी निर्णय झाले. तसेच गणेश उत्सवाच्या माध्यमातून ते विविध चांगले उपक्रम राबवित आहे . असे सांगितले यावेळी आणखी काही पत्रकारांनी आपली मनोगत व्यक्त केली.
व या सोसायटीच्या वतीने आरतीला बोलावून आमचा सन्मान केला याबद्दल उपस्थित सर्व पत्रकार व पोलीस अधिकारी यांनी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानले. तर आपल्या विनंतीला मान देऊन सर्व मान्यवर या श्रींच्या आरतीसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांचे चेअरमन विठ्ठलराव पवार तसेच सर्व संचालक व कर्मचारी यांच्या वतीने ही सर्वांचे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाला शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर, संस्थान सुरक्षा पोलीस अधिकारी रोहिदास माळी, ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर, रामभाऊ लोंढे, दिलीपराव खरात, राजेंद्र गडकरी, प्रशांत अग्रवाल, अशोक दुशिंग, ज्ञानेश्वरी नांदेकर,आदीसह सर्व संचालक , सचिव विलास वाणी, सहसचिव बाबासाहेब अनर्थे, सहाय्यक सहसचिव संभाजी कोते, सर्व कर्मचारी, पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते.
0 Comments