प्रतिनिधी ( रूपाली भालेराव )
नाशिक, दि. १९ ऑगस्ट २०२६ :
नाशिक येथे आज निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा. जितेंद्रजी भावे सर यांची सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व पत्रकारांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील विविध सामाजिक प्रश्न, जनहिताचे विषय, मानवी हक्कांचे संरक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
समाजातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रशासनाकडून अपेक्षित असलेली पारदर्शकता आणि सामाजिक प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याची गरज यावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले.
यावेळी नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई सोनार, पोलखोल टाइम्सच्या मुख्य संपादिका अनिताताई भगवानराव शहाणे, छत्रपती संभाजीनगरचे, लोणी दैनिक भूगोल उप.संपादक.सत्तेचा महासंग्राम सहसंपादक ज्ञानेश्वर साबळे, फलटणचे सामाजिक कार्यकर्ते बबनराव कुलथे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र माळवे, सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई मुंडलिक, संगमनेर तसेच ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया (HRFOI) चे महाराष्ट्र राज्य समन्वयक राजेंद्र कुलथे, शिरूर आदी उपस्थित होते.
मा. जितेंद्रजी भावे यांनी सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक आणि कायदेशीर मार्गाने काम करण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींमध्ये समन्वय वाढवून जनहिताच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
ही सदिच्छा भेट सामाजिक बांधिलकी, जनहित आणि नागरिकांच्या हक्कांसाठी भविष्यात अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.
सत्तेचा महासंग्राम--
प्रतिनिधी -- रूपाली भालेराव
सहसंपादक -- साबळे ज्ञानेश्वर
0 Comments