केंद्रीय प्राथमिक शाळेत राजीव गांधी जयंतीनिमित्त कृतज्ञता दिन साजरा---



दिलीप शिंदे 
सोयगाव, दि. २० -- भारताचे माजी पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार, संगणक व तंत्रज्ञान क्रांतीचे प्रणेते तसेच भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दि.२० गुरुवारी सावळदबारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत कृतज्ञता व्यक्त करत राजीव गांधी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनिल चव्हाण, भागवत गायकवाड, मदन मुठाळ, गजानन गवई, संगीता पाटील, व्ही. एल. राठोड आणि सतीश ढोणे उपस्थित होते.यावेळी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना स्व. राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची माहिती देत भारतातील संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील त्यांच्या ऐतिहासिक योगदानाविषयी मार्गदर्शन केले. आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले.
त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय, सावळदबारा येथे सोयगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्व. राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप देशमुख यांच्यासह सुनील चोरमले, शंकर खराटे, सुनील चव्हाण, प्रमोद कोते, विजय रावळकर, सुभाष पठ्ठे, अमजद तडवी आणि भूषण बोबडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी स्व. राजीव गांधी यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाला अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments