दिलीप शिंदे
सोयगाव, दि. १९ -- जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त अजिंठा डोंगररांगेत वसलेल्या रुद्रेश्वर लेणीच्या निसर्गरम्य पायथ्याशी एकदिवसीय छायाचित्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यासह सोयगाव तालुक्यातील अनेक छायाचित्रकारांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला.निसर्गरम्य वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात छायाचित्रकारांनी एकत्र येत आपल्या क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण केली. अजिंठा डोंगररांगेतील निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा तसेच ग्रामीण जीवनातील विविध पैलू कॅमेऱ्यात टिपण्याची संधी यावेळी छायाचित्रकारांना मिळाली.जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून छायाचित्रण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उपस्थित.
छायाचित्रकारांचा अध्यक्षांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी छायाचित्रण कलेचे महत्त्व, बदलते तंत्रज्ञान आणि नव्या पिढीतील छायाचित्रकारांसमोरील विविध संधी यावर चर्चा करण्यात आली.या उपक्रमामुळे जळगाव जिल्हा आणि सोयगाव तालुक्यातील छायाचित्रकारांना एकत्र येण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. रुद्रेश्वर लेणीच्या पायथ्याशी निसर्ग, छायाचित्रण आणि छायाचित्रकारांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
0 Comments