श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला दरवर्षी मोठ्या संख्येने पायी दिंडीने वारकरी जात असतात .
अहिल्या नगर जिल्ह्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक छोट्या मोठ्या दिंड्या आता सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या असून कंधार, टेंभुर्णी ,करकंब येथे दिंड्या व वारकऱ्यांची मोठी गर्दी सध्या दिसून येत असून सर्वत्र हरिनामाचा गजर ऐकू येत आहे. कंधार येथे श्री पांडुरंगाची भव्य मूर्ती असून ती भाविकांचे मोठे आकर्षण ठरत आहे. सर्वच वारकरी येथे श्रद्धेने दर्शन करून पुढे जात आहे. कंधार हा बागायती परिसर असून रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अनेक केळीच्या बागांमुळे येथे प्रसन्न असे वातावरण आहे.
यावर्षी 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र उत्तर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरकडे पायी वारीने येत असून अहिल्यानगर व उत्तर महाराष्ट्रातील अनेक छोट्या-मोठ्या दिंड्याही श्री क्षेत्र पंढरपूर कडे जात आहेत. सर्वच दिंड्या आता सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. टेंभुर्णी, करकंब येथे मोठ्या प्रमाणात वारकरी हरिनामाचा गजर, कीर्तन ,प्रवचन करताना दिसून येत आहे.काकडा, वाटचाल भजन, हरिपाठ. आरती, होत आहे. रस्त्याने सर्वत्र स्वागताचे फलक लावले असून ठीक ठिकाणी वारकऱ्यांना चहा नाश्ता जेवण मोफत देण्यात येत आहे ,रस्त्यावर वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळे पोलीस स्वतः रात्रंदिवस मेहनत येत आहेत. वाहतुकीची कोंडी होऊ नये, वारकऱ्यांना कोणताही त्यामुळे त्रास होऊ नये. अपघात टळावे म्हणून पोलीस रात्रंदिवस आपले कार्य करत आहे. टेंभुर्णी ला विविध भागातून दिंड्या एकत्र मिळत आहेत.टेंभुर्णी, करकंब व रस्त्यांवर ठिकठिकाणी विविध संस्था किंवा स्वतः काही भाविक वारकऱ्यांची मोठी सेवा करताना दिसत आहे .रस्त्यावर ठिकठिकाणी प्राथमिक उपचार केंद्रे पिण्याची पाण्याची सोय करण्यात आली आहे. सार्वजनिक शौचालय, स्नानासाठी ही विविध ठिकाणी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रस्त्याने छोट्या मोठ्या शेकडोंनी दिंड्या पंढरपूर कडे जात आहेत .त्या दिंड्यांमध्ये सर्वात पुढे भगव्या पताकाधारी, त्या पाठीमागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेला महिला, त्यानंतर सजवलेला श्री पांडुरंगाचा रथ, त्यानंतर भजनी मंडळ, त्यानंतर वारकरी नाचत गात हरिनामाचा गजर करत पंढरपूरकडे निघाले आहेत. ठिकठिकाणी रिंगण, फुगड्या, नाचत हरिनामाचा गजर होत आहे. रस्त्याने अनेक नेते दिंड्यांना भेट देऊन शुभेच्छा देत आहेत. बुधवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण असून अधून मधून पावसाची सर येत आहे. तरीही पावसामध्ये वारकरी हरिनामाचा गजर करत मजल दरमजल करत पंढरपूरकडे जाताना दिसत आहे. यावर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून व विविध गावांमधून अनेक छोट्या मोठ्या दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. यावर्षी दिंड्यांची संख्या वाढली आहे.
0 Comments