बेगवर पोक्सो बलात्काराचा गुन्हा दाखल;१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला केले गर्भवती

दिलीप लोखंडे 


टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील व्यावसायिक आकाश दुबैय्या हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस कडक ॲक्शन मोडवर आले आहे.या हत्याकांडामुळे बेग टोळी पोलीसांच्या निशाण्यावर आली असून आता तक्रारदार,अन्याय पिडीत यांची पोलीस सखोल चौकशी करत आहे.

त्यातच एका १७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून सदर मुलगी अल्पवयीन आहे.अतिशय धक्कादायक बाब म्हणजे ती गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत व पोलीस तपासात समोर आले आहे.
           या प्रकरणी आरोपी सोनू बेग,वय-४१ याच्याविरुद्ध १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याप्रकरणी विविध कलमान्वये पोक्सो व बलात्काराचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलिसांत दाखल झाला आहे.
 हि मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील बळजबरी करुन आरोपीने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान एसपी सुदर्शन मुम्मका,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी देवदत्त भवर व पोनि खैरे हे अधिक तपास चौकशी करत आहे.सोन्या बेगवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भवती केल्याचा पोक्सो गुन्हा दाखल झाल्याने श्रीरामपुरात एकच खळबळ उडाली आहे .

Post a Comment

0 Comments