दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था आणि 11 जुलै रोजी घडलेली युवा उद्योजक आकाश दुबैय्या यांच्या हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन ऍक्टिव मोडवर आलेले आहे.आज दिनांक 20 जुलै 2026 रोजी राज्याच अप्पर पोलीस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था) डॉ.श्री.निखिल गुप्ता तसेच एसआयडी (राज्य गुप्त वार्ता) विभागाचे प्रमुख श्री.शिरीष जैन यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास भेट दिली आहे.सध्या ते पोलीस ठाण्यात असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
0 Comments