लोहगाव (वार्ताहर) – प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील महात्मा गांधी कन्या विद्यालयात गुणवंत, गरीब व होतकरू विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण करण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलिनी जाधव यांनी केले. प्रवरानगर येथील प्रवीण सचदेव यांच्या सहकार्याने तसेच कन्या विभागातील शिक्षकांच्या पुढाकारातून शैक्षणिक गुणवत्तेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण करण्यात आले.
याचबरोबर संकुलाचे प्राचार्य विनायक मेथवडे यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक मूल्ये यांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य संजय डुबे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, संजय ठाकरे, डॉ. शरद दुधाट, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माधुरी वडघुले, संगीता उगले, प्रफुल्ल नव्हाळे, विजयश्री कदम, सुजाता ठाकरे, नंदादेवी बैसाने, कमल थिटे, मीनाक्षी गांगुर्डे, दिपाली आंबेकर, शैलजा सातपुते, प्रमिला पंडोरे, सुवर्णा भोसले आणि विलास गभाले यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कमल थिटे यांनी केले, तर विलास गभाले यांनी आभार मानले.
0 Comments