सध्या राहाता तालुक्यातील म्हणजेच शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सावळीविहीर बुद्रुक येथे बीएलओमार्फत भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने गणना प्रपत्र घरोघरी जाऊन भरण्याचे काम सुरू असून तुकाराम डापसे व मुकेश वाघमारे यांच्यासह इतर बीएलओ यांनी गावात घरोघर जाऊन गणना प्रपत्र भरण्याचे काम सुरू केले आहे. या गणना प्रपत्रात मतदारांच्या नातेवाईकांचा मागील एस आय आर मधील तपशील असून जन्मतारीख, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, वडिलांचे आईचे नाव, पती-पत्नीचे नावे तसेच मतदारसंघ क्रमांक ,यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक अशी माहिती देण्यात येत आहे.
तसेच आपण कोणत्याही इतर देशाचे नागरिकत्व प्राप्त केलेले नाही तसेच माझ्या कुटुंबातील सदस्य किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही विधानसभा मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघातील मतदार यादीत मतदार म्हणून आमची नावे नसून याच मतदारसंघात मतदार यादीत माझे नाव असून ते समावेशासाठी आपण अर्ज करत आहोत. असे त्यात म्हटले आहे . आपण ही सत्य माहिती देत असल्याचे घोषणापत्र मतदाराने या गणनाप्रपत्रात भरून द्यायचे आहे. या घोषणा पत्रावर मतदार किंवा कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्यांची सही किंवा अंगठा असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारीची स्वाक्षरी राहणार आहे. एक गणना प्रपत्राची प्रत मतदाराकडे माहितीसाठी राहणार आहे. हे गणना प्रपत्र भरण्यासाठी मतदाराचे दोन फोटो, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. असे बी एल ओ सुपरवायझर सुजित पोपटराव कालेकर व बीएलओ तुकाराम डापसे यांनी यावेळी सांगितले.
0 Comments