एन पी व्हिजन'च्या 'तेरे बिना अधुरा' अल्बमच्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते शानदार अनावरण




लोणी :
मराठी मनोरंजन विश्वात आपल्या दर्जेदार आशयाने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिख गाठणाऱ्या 'एन पी व्हिजन' या युट्युब चॅनेलने आता एक नवीन पाऊल उचलले आहे. 'तेरे बिना अधुरा' या आगामी म्युझिक अल्बमच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'एन पी व्हिजन'च्या यापर्यंतच्या प्रवासाचे आणि नवनवीन प्रयोग करण्याच्या धडपडीचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक करण्यात आले. अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारा हा चॅनेल आता आपल्या या नवीन सादरीकरणातून प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे.
या अनावरण सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यामध्ये विजय माळवे सर, सतीश मनतोडे सर, मेजर शेवंते साहेब, रावसाहेब पर्वत साहेब, पत्रकार कोंडीराम नेहे साहेब, आणि दरेकर सर यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींनी उपस्थित राहून या अल्बमला आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी असे मत व्यक्त केले की, 'एन पी व्हिजन'चा प्रवास हा अत्यंत कौतुकास्पद असून, त्यांनी ज्या पद्धतीने कमी वेळात आपली ओळख निर्माण केली आहे, एमपी व्हिजनचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नवोदित कलाकारांना संधी देत चांगल्या कलाकारांना अभिनयाची एक चांगली संधी उपलब्ध करून दिली त्यांच्या या प्रवासात एम पी व्हिजन चैनल हे कलाकारांना आपलेसे वाटतं त्यामुळे निर्माते आबा निर्मळ यांनी व प्रमोद निर्मळ घेतलेली मेहनत खरोखरच प्रेरणादायी आहे. या नवीन अल्बमबद्दल उपस्थितांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत होती.
'तेरे बिना अधुरा' हा अल्बम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, तो अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा ठाम विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. या गाण्यातील आशय, सादरीकरण आणि सांगीतिक बांधणी ही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या प्रकल्पाच्या निमित्ताने नवनवीन आणि उदयोन्मुख कलाकारांना आपले कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. मनोरंजन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळवून देण्यामध्ये 'एन पी व्हिजन'ने नेहमीच पुढाकार घेतला असून, हा अल्बम या प्रवासातील एक मोलाचाठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. एकूणच, हा कार्यक्रम 'एन पी व्हिजन'च्या पुढील वाटचालीस अधिक बळ देणारा ठरला आहे यावेळी अल्बमच्या पोस्टर अनावरण कार्यक्रमाच्या वेळी दिग्दर्शक निर्माते आबा निर्मळ , ज्ञानेश्वर साबळे , रूपाली भालेराव, गोपाळ राऊत आणि श्रीपाद बोकंद हे देखील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments