अध्यात्म, सेवा ,संस्कार, राष्ट्रधर्म यांच्या प्रसारासाठी श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्माराम गिरीजी ट्रस्ट करत आहे कार्य--महंत आत्माराम गिरीजी महाराज

शिर्डी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र हा साधू संतांचा,महात्म्यांचा प्रदेश असून अहिल्यानगर जिल्हा अनेक देवस्थाने व प्रसिद्ध धार्मिक स्थळे असणारा अध्यात्मिक असा जिल्हा समजला जातो. अशा या जिल्ह्यामध्ये राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील श्री नर्मदेश्वर सेवाधाम हे एक प्रसिद्ध असे धार्मिक केंद्र असून येथे श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्मारामगिरी ट्रस्ट तर्फे सर्व समाज घटकांना एकत्र आणून वसुधैव कुटुंबकम, सर्वे भवन्तु सुखिन! या सनातन मूल्यावर आधारित अखंडितपणे कार्य सुरू असल्याची माहिती महंत संन्यासी आत्मारामगिरीजी महाराज यांनी दिली आहे.
   येथे ट्रस्टच्या आत्मज्ञान, सेवा, संस्कार ,धर्मरक्षण ,राष्ट्रनिर्माण या मूलमंत्रानुसार , व सनातन वैदिक परंपरेनुसार अहोरात्र कार्य सुरू आहे. 
    महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 
'श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्माराम गिरी ट्रस्ट' ही संस्था सनातन वैदिक परंपरा, अध्यात्म, सेवा, संस्कार आणि राष्ट्रधर्म यांचा प्रसार करण्यासाठी समर्पित आहे. या ट्रस्टच्या नावामध्येच त्याचे ध्येय, तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक दिशा सामावलेली आहे.
'श्री' हा शब्द मंगल, ऐश्वर्य, दैवी कृपा आणि शुभारंभाचे प्रतीक आहे.नर्मदेश्वर' म्हणजे पवित्र माता नर्मदेच्या कृपेने प्रकट झालेले शिवस्वरूप. भगवान शंकर, नर्मदा आणि तपश्चर्या यांचा अविभाज्य संबंध दर्शविणारे हे नाव भक्ती, साधना, त्याग आणि आत्मशुद्धीची प्रेरणा देते.तर
'संन्यासी' हा शब्द वैराग्य, आत्मज्ञान, संयम, निःस्वार्थ सेवा आणि लोककल्याणाचा संदेश देतो. संन्यास म्हणजे केवळ वस्त्रपरिवर्तन नसून अहंकार, आसक्ती आणि स्वार्थाचा त्याग करून परमात्मप्राप्तीच्या मार्गावर चालणे होय. त्याचप्रमाणे
'आत्माराम गिरी' हे संन्यासनाम आत्मस्वरूपात रममाण होण्याची प्रेरणा देणारे आहे. 'आत्माराम' म्हणजे आत्म्यात आनंद मानणारा, तर 'गिरी' ही दशनामी संन्यास परंपरेतील एक पवित्र शाखा असून ज्ञान, तप, शिस्त आणि धर्मरक्षणाचे प्रतीक मानली जाते. अशा या
या ट्रस्टचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे समाजात आध्यात्मिक जागृती घडविणे, भारतीय संस्कृतीचे जतन करणे, गुरुकुल शिक्षणाला प्रोत्साहन देणे, व्यसनमुक्ती अभियान राबविणे, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, गरजूंची सेवा करणे, पर्यावरण संवर्धन, गोसेवा, युवकांना संस्कारयुक्त मार्गदर्शन आणि राष्ट्रहिताची भावना दृढ असून या ट्रस्टचा आत्मज्ञान • सेवा • संस्कार • धर्मरक्षण • राष्ट्रनिर्माण"हा मूलमंत्र असून त्यानुसार ट्रस्टचे कार्य सुरू आहे. ही संस्था सर्व समाजघटकांना एकत्र आणून "वसुधैव कुटुंबकम्", "सर्वे भवन्तु सुखिनः" आणि "नरसेवा ही नारायण सेवा" या सनातन मूल्यांवर आधारित कार्य करण्यासाठी कटिबद्ध असून तसे कार्य महंत संन्यासी आत्माराम गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने येथे सुरू असून येथील शिष्य ,साधक, भाविक यांचा त्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. असे साधकही बोलत आहेत.

Post a Comment

0 Comments