संत सावता सोसायटीचा शंभर टक्के कर्जाचा वसुल



टाकळीभान प्रतिनिधी : संस्थेच्या
स्थापनेपासुन कर्जाचा १०० टक्के वसुल देण्याची परंपरा गेली १५ वर्षांपासुन आहे. माजी आमदार स्व. जयंतराव ससाने, स्व. भाऊसाहेब दाभाडे दिवंगत चेअरमन स्व. एकनाथ लोखंडे यांनी घालुन दिलेला आदर्श पुढे सुरु ठेवत संस्थेने यंदाही ३१ मार्च अखेर बँक पातळीवर १०० टक्के वसुल दिला होता तर ३० जुन अखेर संस्था पातळीवर १०० टक्के वसुल देवुन १०० टक्के वसुलाची परंपरा कायम राखली आहे.
       श्रीरामपुर तालुक्याच्या पुर्व भागातील महत्वाच्या आसलेल्या टाकळीभान येथील श्री संत सावता माळी वि.वि.कार्य. सेवा सोसायटीची गेली १५ वर्ष शंभर टक्के वसुल देण्याची परंपरा आहे. माजी आमदार स्व जयंतराव ससाने यांनी संस्थेला ही शिस्त लावली आहे. संस्थेचे चेअरमन स्व. एकनाथ लोखंडे, जेष्ठ संचालक स्व भाऊसाहेब दाभाडे यांनी हा आदर्श संस्थेत रुजवण्यासाठी प्रथम पासुन प्रयत्न केले. स्व. जयंतराव ससाने यांच्यानंतर नगराध्यक्ष तथा जिल्हा सह. बँकेचे माजी संचालक करण ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगतीपथावर आहे. ३१ मार्च रोजी संस्थेच्या सर्व कर्जदार सभासदांनी घेतलेल्या ७४.७१ उचल केलेल्या कर्जाचा संपुर्ण भरणा करुन संस्थेने बँक पातळीवर १०० टक्के वसुल बँकेला दिला होता. तर काल ३० जुन रोजी रोजी उर्वरीत कर्जाचा भरणा करुन संस्थाने संस्थापातळीवर १००टक्के वसुल देणारी संस्था ठरली आहे.     
   याकामी संस्थेचे शाखाधिकारी
भरत क्षिरसागर, लिपिक सुहास भागवत, जयश्री परदेशी, दत्ताञय
सोमासे, कशिआर प्राजक्ता राजभोज, संस्थेचे सचिव रामनाथ ब्राम्हणे, विठ्ठल बनकर, रवि शिरसाठ, रघुनाथ शेळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वसुली कामी संस्थेचे चेअरमन बाबा तनपुरे, व्हा चेअरमन शिवाजी शिरसाठ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व संस्थेचे संचालक विलासराव दाभाडे, चंद्रकांत लांडगे, आदींनी विषेश परीश्रम घेतले,सभासदांच्या सहकार्यामुळे १०० टक्के वसुलाची परंपरा कायम राखता आल्याची प्रतिक्रीया यावेळी संचालकांच्या वतीने देण्यात आली. शाखाधिकारी क्षिरसागर यांनी संचालक मंडळाचा सत्कार करुन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
     यावेळी प्रगतशील शेतकरी शिवाजीराव धुमाळ, टाकळीभान सेवा सोसायटीचे माजी चेअरमन एकनाथ पटारे, प्रकाश दाभाडे,बाबासाहेब बनकर, माजी उपसरपंच पाराजी पटारे, मोहन रणनवरे भारत भावा छोटू बनकर, यावेळी सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते,
.

Post a Comment

0 Comments