टाकळीभान - प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील बी.के. आर. वाघमारे यांच्याकडे किरकोळ केरोसीन विक्री केंद्राचा परवाना भेटला असून या रॉकेल विक्री केंद्राचे उदघाटन माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.


             याप्रसंगी अशोक चे विद्यमान संचालक यशवंत रणनवरे, मा. उपसरपंच कान्हाभाऊ खंडागळे पत्रकार चंद्रकांत लांडगे विजय देवळालकर, दिलीप लोखंडे, अशोक रननवरे, बापूसाहेब नवले, जयकर मगर सर, सेवा संस्थेचे माजी व्हायचं अविनाश लोखंडे, माजी सरपंच किशोर मैंड, बापुमामा पटारे, प्रतिबंध सेवा समितीचे माजी चेअरमन राहुल पटारे, अशोक शेळके, अण्णासाहेब शिंदे, सौ. लता शिंदे, सौ अर्चना सूर्यवंशी, राजू देवळालकर, साईनाथ खंडागळे आदी सर्वजण हजर राहून रॉकेल उदघाट्न केले.
          टाकळीभान गावात चार रॉकेल परवाने होते यांनी कोणताच पाठपुरावा न केल्यामुळे हा परवाना इतरत्र जाणार होता परंतु माजी सभापती नानासाहेब पवार उपसरपंच कान्हा खंडागळे, सरपंच अर्चनाताई रणनवरे , भागवत रणनवरे अशोक की संचालक यशवंत रणनवरे यांनी माझ्यासाठी विशेष प्रयत्न करून हा परवाना मला मिळाला 
         या गावात 47 वर्ष रंभाजी वाघमारे यांचे रेशन दुकान होते. त्यांनी कधीही दुष्काळकात गोरगरिबांना अन्नधान्याचा कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सतत पाठपुरावा केला याची महसूल विभागाने दखल घेऊन वाघमारे यांना देण्यात आला आहे.
               पंधरा वर्षानंतर प्रथमच टाकळीभान गावात रॉकेल केंद्राचा परवाना सुरू झाल्यामुळे पंचायत समितीचे व मार्केट कमिटी माजी सभापती नानासाहेब पवार गावातील नेते मंडळी, पत्रकार, कार्ड धारक यांनी समाधान व्यक्त केले असून टाकळीभान गावात रॉकेल येण्यासाठी मा.तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, एस. आय. ओ. शिंदे, पुरवठा अधिकारी एस. आय. पुजारी.या सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.