राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील संजय चंद्रभान बेंद्रे हे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या इलेक्ट्रिक विभागात 37 वर्षे सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचा प्रवरा प्रेस क्लबच्या वतीने नुकताच त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय बोडखे दैनिक क्षितीज समाचार चे संपादक गोरक्ष गवारे .राष्ट्रीय पत्रकार कोंडीराम नेहे पाटील. हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कोंडीराम नेहे म्हणाले की जीवन खूप सुंदर आहे. त्याचे उदाहरण म्हणजे संजय बेंद्रे यांनी आपल्या सेवेत सेवा करत असताना लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांशी मिळून मिसळून व खेळी मेळीच्या वातावरणात आपली सेवा पूर्ण केली .
लहानांपासून मोठ्यापर्यंत ते सर्वांची षष्टा करायचे.
वेळप्रसंगी आपल्यावर बाजू आल्यावर तिथून निघून जाणं पसंत करायचे पण त्यांनी कोणालाही उद्धटपणा बोलले नाही. त्यांच्या नोकरीत त्यांना बरचसे चढउतार बघण्याची वेळ आली .परंतु त्याला न डगमग त्यांनी आपली सेवा पूर्ण केली. अहंकार व मी पणचा गर्व त्यांना कधीच तुलाा नाही . म्हणून मला वाटते की आयुष्यात एवढा पाऊस व्हावा की आपल्याला झालेला इगो अहंकार व मी पण गर्व पावसाप्रमाणे धोऊन जावा व पुन्हा नवीन आयुष्य जगण्याची परमेश्वर प्रत्येकाला सद बुद्धदेवो . संजय चंद्रभान बेंद्रे यांना सेवानिवृत्तीबद्दल सर्वांच्याावतीने खूप खूप शुभेच्छा.
0 Comments