टाकळीभान - प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा व निसर्ग सामाजिक पर्यावरण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्ताने महादेव मंदिर व न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान येथे वृक्षारोपण करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी किसान सभा उत्तर जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र कोकणे, शेतकरी संघटनेचे प्रवक्ते प्रा,कार्लस साठे सर, अर्जुन राऊत, श्रीधर गाडे काका यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच विभागीय कबड्डीपटू गणेश ब्राह्मणे व मयूर दिलीप लोखंडे तिरंदाजी जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला,या गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला ,
तसेच न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान येथे सोसायटीचे चेरमन तथा स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राहुल पटारे, प्राचार्य शिंदे, पर्यवेक्षक जरे, आदिनाथ पाचपिंड, संदीप जावळे सर, देवरे सर, शुभम पवार सर, अनिल बोडखे, दत्तू काका मगर, बबनराव मगर, काकासाहेब डिके, देविदास कोकणे, धनराज कोकणे, रेवनाथ कोकणे, गजानन कोकणे, बंडू पंत कोकणे,अनिल कोकणे, भाऊराव कोकणे, सुजित बोडखे, अरविंद साळवे, विष्णुपंत पटारे, अमोल पटारे, सुरेश पवार, राजेंद्र रणनवरे, पवन मगर, रणजीत मगर, पत्रकार संदीप बोडखे, दिलीप लोखंडे, अशोक रणवरे मधुकर गायकवाड,गोवर्धन पटारे, बाळासाहेब थोरात, ग्रा. सदस्य भाऊसाहेब पटारे भाऊसाहेब गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते,
0 Comments