संगमनेरात १२ जुलैस भारतीय प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षण गरुड अकॅडमीचे उद्घाटन*

भोसले महेश

संगमनेर (प्नतिनिधी) महाविद्यालयीन क्षेत्रात व्यावसायिक कोर्सेसची सुरुवात झाल्यानंतर सध्याच्या खाजगी क्षेत्राची परिस्थिती सर्वाना माहीतच आहे,येणाऱ्या काळात सरकारने अनेक हजारो शासकीय पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरायचे ठरविले आहे,व आता येणारा ८ वा वेतन आयोग देखील लागू होण्याची शक्यता आहे.या स्पर्धा परीक्षेच्या युगात अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण अकॅडमी सर्वात सक्षमही असे मार्गदर्शन केंद्र संगमनेर मध्ये उभारण्याचा निर्धार सौं. किरण गणेश गागरे यांनी केलेला आहे.
जसा लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय तसाच सर्व सरकारी परीक्षा पूर्व तयारीसाठी सध्या संगमनेर पॅटर्न गाजणार असा ठाम विश्वास संचालकांनींची आणि व्यक्त केला.संगमनेरात निर्माण होणाऱ्या बहुचर्चित 'गरुड" भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षणआणि अकॅडेमीच्या माध्यमातून पुणे ते नाशिक आणि मुंबई ते गडचिरोली याआणि सुवर्ण माध्यात ही अकॅडेमी सुरु करण्याचाआहे निर्धार संयोजकानी व्यक्त केला.प्रसंगी पु जात बोलताना संचालक सौ.किरण गागरे म्हणाल्या की संगमनेरात निर्माण होणाऱ्या या गरुड अकॅडेमीत गट ड पासून ते क्लास १ पर्यंत सर्व मार्गदर्शन हे संगमनेर मध्ये मिळणार आहे.हे एक मोठे पाऊल आपल्या भागात पडत आहे.पोलीस भरतीसाठी असंख्य उमेदवार आपल्या भागात आहेत, निवड झालेले उमेदवार सगळे दाखवतात पण राहिलेले विद्यार्थी वर्षनुवर्षे तयारी करत राहतात हे दुर्दैव!त्यांना आम्ही जे हरलेले आहेत त्यांना घडवतो,किती भरती झाले यापेक्षा किती राहिले हे आम्हीच दाखवू प्रवेश किती आणि निवड किती हे आम्ही पहिल्यांदा विद्यार्थी, पालकांना दाखवू आमच्या यशवंत विद्यार्थ्यांचे प्रमाण ९९ टक्के असेल. प्रत्येक ठिकाणी येणारा पहिला विद्यार्थी हा गरुड१२ अकॅडमीचाच असेल कारण ही सर्व शेतकऱ्यांची पोरं आहे, कणखर आहे यश खेचून आणणारी आहे आणि त्यांची बौद्धिक मशागत करण्यासाठी संगमनेर पॅटर्नची गरुड अकॅडमी ठामपणे उभी असेल मैदान ५० पैकी ५० करु लेखी १०० पैकी १०० गुण करु अशी अपेक्षा संचालक सौ.किरण गागरे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments