राजुरी (वार्ताहर)
हातात भगव्या पताका... टाळ मृदुंगाचा गजर करत निघालेल्या श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वर येथून निघालेल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या वतीने आषाढी एकादशीला पंढरपूरला निघालेल्या निवृत्तीनाथाच्या पालखी व दिंडीचे ७ जुलै रोजी राजुरी नगरीत दुपारी ४ वाजता भक्तिमय वातावरणात आगमन झाले. सालाबाद प्रमाणे त्रिंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडी सोहळ्याचे राजुरी येथे मुक्कामी आगमन झाले.
राजुरी येथील भजनी मंडळ, राजुरी ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांच्या वतीने बाभळेश्वर -श्रीरामपूर रोडवर राजुरी जवळील सीमेवर मोठ्या उत्साहात टाळ मृदुंगाचा गजर, सनईच्या सुरात व फटाक्याची आतच बाजी करत मोठ्या उत्साहात भाविक भक्तांनी या दिंडीचे स्वागत केले. निवृत्तीनाथ महाराज पालखीचे राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या आवारामध्ये मुक्कामी असते. यानंतर सायंकाळी ६ ते ७ या वेळेत कीर्तन रुपी सेवा दिल्यानंतर राजुरी ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या वतीने जमा झालेल्या आमटी व भाकरीचा महाप्रसाद येणाऱ्या सर्व दिंडीतील भाविक भक्तांना वाटप केला जातो. यानंतर रात्री मोठ्या प्रमाणात राजुरी व परिसरातील अनेक वाड्यां वस्त्यांवर दिंडीमध्ये सहभागी झालेले भाविक भक्त मुक्कामी राहतात. यानंतर ८ जुलै रोजी सकाळी पालखीची विधिवत पूजा होऊन सकाळी आठ वाजता श्रीरामपूर मार्गे बेलापूर कडे हा दिंडी सोहळा मार्गस्थ होतो. यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या दिंडीमध्ये सामील झाले असून अंदाजे लाखो भाविक भक्त या दिंडी सोहळ्यात असल्याचे या दिंडीचे आयोजक यांच्यावतीने सांगण्यात आले. राजुरी येथील मुक्कामी आलेल्या या दिंडीचे राजुरी येथील भजनी मंडळ, राजुरी ग्रामपंचायत, राजुरी सोसायटी तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी, गावातील युवक महिला हे या दिंडीतील भाविक भक्तांची सोय करण्यासाठी मदत करीत असतात. तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, व शासनातील विविध पदाधिकारी अधिकारी या दिंडी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी दरवर्षी मदत करत आहेत.दरवर्षी पेक्षाही यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या दिंडीमध्ये सामील झाल्याचे चित्र पहावयास मिळाले बाबळेश्वर पासून राजुरी पर्यंत अंदाजे दोन ते तीन किलोमीटर भाविक भक्तांची रांग लागल्याचे चित्र पहावयास मिळाले त्यातच गेल्या दोन दिवसापासून पावसाची मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असल्यामुळे या रिमझिम पावसामुळे भाविकांचे थोड्याफार प्रमाणात का होईना हाल होताना दिसत आहे परंतु गावोगावी लोक आपापल्या पद्धतीने जिथे जागा भेटेल तिथे मुक्काम करताना दिसत दिसत असून भाविक मात्र पाऊस पडत असल्यामुळे आनंदी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
फोटो राहता तालुक्यातील राजुरी येथे संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचे टाळ मृदंगाचा गजर तसेच फटाक्याच्याअतिशबाजी करत ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी घेतलेले हे छायाचित्र. ( छायाचित्र विजय बोडखे राजुरी)
0 Comments