गटकळ स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न




टाकळीभान प्रतिनिधी- गटकळ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये नुकतेच नवीन शैक्षणिक वर्षासाठी हेड बॉय , हेड गर्ल , स्पोर्ट कॅप्टन बॉईज , स्पोर्ट कॅप्टन गर्ल या पदासाठी मतदान झाले मतदानाच्या माध्यमातून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना आज पदा चे बॅचेस देऊन शपथ विधी समारंभ पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकळीभान येथील युवा उद्योजक गणेश कोकणे हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना बॅचेसचे वाटप करण्यात आले,
 आपल्या देशात होणारी मतदान प्रक्रिया त्यातून निवडून येणारे उमेदवार याचा प्रत्यक्ष अनुभव शाळेत विद्यार्थ्यांना घडवून आणण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट भाऊसाहेब टेमक व एडवोकेट सुरेखा टेमक यांनी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या,
शाळेच्या प्राचार्या भारती कुदळे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की आयुष्यामध्ये खरा सेवक होण्यासाठी आपण स्वयंशिस्तीचे पालन केले पाहिजे ,समाजसेवा करावी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता पटारे व वर्षा मगर यांनी केले व आभार प्रदर्शन माधुरी गटकळ यांनी केले,

Post a Comment

0 Comments