भटक्या कुत्र्यांचा सात वर्षीय शालेय विद्यार्थिनी वर हल्ला,निंबायती गाव येथील घटना---




दिलीप शिंदे
सोयगाव दि.०८--शाळेतून रस्त्याने घरी जात असताना सात वर्षीय शालेय विद्यार्थिनी वर भटक्या दहा ते बारा कुत्र्यांच्या टोळक्याने जोरदार हल्ला चढवून जखमी केल्या ची घटना दि.०७ मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली या खळबळ जनक घटनेमुळे निंबायती गाव येथे भटक्या कुत्र्यांची ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली असून ग्रामस्थ भेदरलेल्या अवस्थेत घरातच बसून आहे.

आयेशा अश्फाक बागवान(वय ०७) ही विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या दहा ते बारा भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने या मुलीवर जोरदार हल्ला चढवला यामध्ये तिच्या मानेचे व डोळ्यांचे लचके तोडून तिचे डोक्याचे केस ओढून तिला पाच ते सात फूट अंतरावर ओढत आणले दरम्यान तिच्या आवाजाने ग्रामस्थांनी धाव घेत भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून तिला सुटका करून तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला मंगळवारी रात्री पुढील उपचारासाठी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान गेल्या तीन ते चार दिवसापासून जरंडी आणि निंबायती परिसरात शंभर ते दीडशे नवीन भटके कुत्रे आढळून येत आहेत अज्ञात इसमांनी वाहनाने भरून ही कुत्रे या परिसरात आणून सोडल्या चे नागरिक सांगत आहेत ही भटके कुत्रे गाव शेती शिवारात भटकंती करत आहेत सध्या शेती शिवारात खरिप पेरण्या सुरू आहे त्यामुळे मजुरांमध्ये भीती पसरली आहे..

Post a Comment

0 Comments