या पत्रकात म्हटले की, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सद्गुरु नारायणगिरीजी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, कै.गंगाधर महाराज होन यांच्या आशीर्वादासह ह भ प श्री विश्वनाथ महाराज होन,हभप संजय महाराज लोंढे, ह भ प भानुदास महाराज माळी,ह भ प शेटे आण्णा, व तनपुरे दादा, (राहुरी)भारतराव जमधडे, राजूभाऊ सुरासे,भगीरथ होन ,किशोरभाऊ जावळे, राजूभाऊ सुराळे, भीमाभाऊ वर्पे,पुंजाभाऊ होन, ,दत्ताभाऊ शिंदे, वसंतराव शिरसागर ,रामलाल सोनवणे, रामेश्वर चव्हाण, बाळासाहेब माळी, अशोक कुऱ्हे, पत्रकार राजेंद्र गडकरी, सतीश जपे, सागर जाधव, सुभाष चव्हाण,हरिभाऊ पवार,
राजूभाऊ पवार ,चंद्रभान व शिवाजी कांदळकर, दादासाहेब माळी, जालिंदर मोरे, गोवर्धन माळी, श्रीधर जाधव ,शिवाजी मोरे, दगडू माळी, गोरख माळी, मच्छिंद्र माळी ,शरद होन,यांच्या व इतर वारकरी यांच्या सहकार्याने 13 जुलै 2026 रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचे व रथाचे पूजन करून या दिंडीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान होणार असून चांदेकसारे येथून सावळी विहीर , निमगाव ,निघोज, शिर्डी मार्गे दिंडी जाणार असून सायंकाळी राहत्याला श्री नवनाथ मंदिर येथे मुक्कामी असणार आहे. दिंडीचा दुसरा मुक्काम ज्ञानदेव पा. कोळसे वस्तीवर तर तिसरा मुक्काम नांदगाव, जिल्हा अ, नगर येथे असणार आहे. चौथा मुक्काम दरेवाडी, अहिल्यानगर, तसेच पाचवा मुक्काम ह भ प दत्तात्रय शेटे, (केशव गोडे,हॉटेल आदेश) आंबीलवाडी सहावा मुक्काम ह भ प गुलाबराव गवारे व ह भ प राहुल गवारे वस्ती, कोकणगाव, सातवा मुक्काम ह भ प अभिजीत शेंडकर वस्ती निमगाव डाकू ,तर आठवा मुक्काम करमाळा येथे राहणार आहे. नववा 21 जुलै रोजीचा कविटगाव येथे ह भ प पांडुरंग भोसले यांच्या वस्तीवर मुक्काम असणार असून 22 तारखेला टेंभुर्णी येथे दिंडीचा ह भ प प्रभाकर व बापूसाहेब कुटे वस्तीवर मुक्काम असणार आहे. दिनांक 23 रोजी करकंब येथे दिंडी पोहोचणार असून तेथे मुक्काम असणार आहे. दिनांक 24 जुलै 2026 रोजी दिंडी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. दिंडी सोहळ्यासाठी सकाळी चहा नाश्ता , दुपारी व सायंकाळी महाप्रसाद अनेक अन्नदात्यांनी दिले आहे. तसेच सर्वांना दातांचे व वारकरी मंडळीचे दिंडीतर्फे धन्यवादही मान्यता आले आहे . दिंडीच्या वतीने मुक्कामाचे ठिकाणी भजन हरिपाठ आरती आदी धार्मिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. दिंडीमध्ये प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवरच राहील. दिंडीमध्ये स्वतःचा बिछाना घ्यावा. तसेच दिंडीच्या नियमांचे पालन करावे. असे म्हटले असून इच्छुक भाविकांनी मोठ्या संख्येने या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे. असे आवाहान या पत्रकात करण्यात आले आहे.
0 Comments