गोदावरी कालव्याना पाणी सोडून लाभक्षेत्रातील पिकांना पाणी द्यावे

वाकडी खंडोबाची प्रतिनिधी 

गोदावरी कालवे सोडून लाभक्षेत्रातील उभे असलेले पिके ऊस फळबागा यास पाणी ध्यावे असी मागणी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्धारे केली आहे पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे की राहाता चितळी लाभक्षेत्रामध्ये अत्य अल्प पाऊस चालू आहे आज पिकांना पाण्याची गरज आहे पाटबंधारे विभागाकडे उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी सात नंबर अर्ज भरले होते.

 यावर्षी जुन महिन्यात पाऊस न पडल्यामुळे शेतकरी संघटना व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी या आर्वतनातून पाणी ध्यावे अशी मागणी केली परंतू पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याचा निर्णय शाशनाने व पाटबंधारे विभागाने घेतला व चालू पाणी बंद केले पंरतू आता घाटमाथा समुहातील सर्व धरणामध्ये अती  पाऊस पडत आहे शिवाय गोदावरी नदीला 26000 हजार क्वीसने पाणी सोडले त्यामध्ये कालवे सोडावे म्हणजे शेतातील जळू लागलेले पिके वाचतील असी मागणी शेतकरी संघटना व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments