केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचे टाकळीभान येथे भव्य स्वागत



टाकळीभान - प्रतिनिधी - टाकळीभान येथे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा भव्य सत्कार तंटामुक्तीचे अध्यक्ष आबासाहेब रणनवरे यांच्या हस्ते करण्यात आला,
         अहिल्यानगर येथे सामाजिक न्या केंद्रीय मंत्री नुकताच दौरा असून जिल्ह्यातील सर्व दीन दलितांचे व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हा दौरा असून , टाकळीभान येथे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांसाठी अधिकृत जागा असेल ,त्याठिकाणी बसवा त्याचा प्रस्ताव मला पाठवा आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचाही पुतळा या ठिकाणी बसवा. तसेच बस स्टँड परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आय लव डिजिटल लाइटिंग पाहून रामदास आठवले भारावून गेले. 
           रामदास आठवले यांच्या समवेत माजी मंत्री अविनाश महातेकर, राष्ट्रीय सरचिटणीस काकासाहेब खंबाळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, विजयराव वाकचौरे, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, प्राध्यापक कार्लस साठे त्यांच्या दौऱ्यात सामील होते 
         याप्रसंगी प्राध्यापक कार्लस साठे,आप्पासाहेब रणवरे, धावपटू भाऊसाहेब गव्हाणे, खरात मामा, एडवोकेट संदीप शिंगारे, राजेंद्र रणनवरे, माजी मुख्याध्यापक अरुण बनसोडे, सुनील भोसले,सर्व आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित राहून फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत करत आले.

Post a Comment

0 Comments