विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखीचे प्रवरा परिसरातील पवित्र भूमीत भक्तिमय स्वागत!

सुरेश ठोके 
 गोगलगाव ( ता: राहाता) | विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखीचे प्रवरा परिसरातील पवित्र भूमीत भक्तिमय स्वागत! 
पाऊले चालती पंढरीची वाट!श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा प्रवास करणाऱ्या विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी वारी पायी पालखीचे गोगलगाव येथे समस्त शिर्डी मतदार संघाच्या वतीने भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष व विखे पाटील कारखान्या चे अध्यक्ष डॉ सुजय दादा विखे पाटील यांनी मनःपूर्वक स्वागत केले व श्रींच्या पादुकांचे भक्तिभावाने दर्शन घेतले.

टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय जय रामकृष्ण हरीच्या अखंड नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. डोळ्यांत फक्त श्री विठ्ठलाला पाहण्याची आस आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास पण तरीही चेहऱ्यावर विलक्षण तेज असलेले वारकरी, त्यांच्या विठ्ठलभक्तीने ओथंबलेले वातावरण मनाला आध्यात्मिक ऊर्जा देणारे ठरले.
तसेच याप्रसंगी खा भाऊसाहेब वाकचौरे ,श्री संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर देवस्थान त्र्यंबकेश्वर चे अध्यक्ष राहुल महाराज साळुंके , नवनाथ महाराज गांगुर्डे आणि सर्व विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख माधवदास महाराज राठी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments