तालुक्यातील उमर विहिरे गावाजवळ तासभर वाहतूक कोंडी, कल्याण टोल कंपनीचे दुर्लक्ष ---




दिलीप शिंदे
सोयगाव दि.०६-- कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लि. इंदौर या कंपनीने पावसाळ्यातील नियोजनाच्या अभावामुळे दि.०६ सोमवारी झालेल्या पावसामुळे उमर विहिरे गावाजवळ एक तास वाहतूक कोंडी झाली होती. याप्रकारामुळे वाहन धारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

दरम्यान मोहळाई - सोयगाव फर्दापूर या ६७ किमी रस्ता रुंदीकरणाचे काम कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लि.ही कंपनीने गेल्या वर्षभरापासून सुरू केले असून कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लि. च्या पावसाळ्यातील नियोजनाच्या अभावामुळे सोयगाव- बनोटी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या कामा दरम्यान पर्यायी रस्त्याने मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने रस्ता दिसेनासा झाला असून चिखलमय झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दि.०६ सोमवारी पाऊस झाल्याने उमर विहिरे गावाजवळ मोठा खड्डा पडला असून त्यात पाणी साचल्याने रस्त्याला जणू तलावाचे स्वरूप आले होते यामुळे उमर विहिरे गावाजवळ एक तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मातीमिश्रीत मुरुम ची पाणी टाकून व्यवस्थित पणे दबाई केली नसल्याने रस्त्यावर चिखल झाला आहे यामुळे दुचाकी,चारचाकी वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.दरम्यान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने मातीमुरम टाकून तात्पुरता रस्ता सुरळीत केल्याने ठप्प झालेली वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.परंतु पावसाळ्याचे दिवस सुरू असून सोयगाव बनोटी रस्त्यावर केंव्हा वाहतूक कोंडी होईल हे सांगता येत नाही.पर्यायी रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments