श्री संत तुकाराम महाराज मंदिर ग्रेनाईट कामाचा शुभारंभउद्योगपश्री संत तुकाराम महाराज मंदिर ग्रेनाईट कामाचा शुभारंभउद्योगपती अश्पाकभाई शेख यांच्याकडून मंदिरास ग्रेनाईट


दिलीप लोखंडे 
 टाकळीभान प्रतिनिधी : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिराचे निर्माण कार्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व श्री क्षेत्र देवगड संस्थांनचे उत्तराधिकारी ह.भ.प. स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली सुरू असून या मंदिराचा ग्रेनाईट कामाचा शुभारंभ नूकताच ह.भ.प. संतोष महाराज चौधरी, ह.भ.प. कृष्णा महाराज वाघुले, मौलाना अहमद शेख, प्रसिद्ध उद्योगपती अशपाकभाई शेख यांच्याा शुभहस्ते करण्यात आला.
    मंदिर निर्माण कार्य हे अंतिम
टप्प्यात आले असून, प्रसिद्ध उद्योगपती अशपाकभाई शेख यांच्याकडे सेवेकरी मंडळींनी मंदिर निर्माण कार्यासाठी ग्रेनाईट ची मागणी केली असता त्याच क्षणी मंदिरास लागणारे संपूर्ण ग्रेनाईट देण्याचा शब्द अशपाकभाई शेख यांनी दिला होता. 
छत्रपती संभाजी नगर व नेवासा फाटा या ठिकाणावरून ३,३५,००० रुपयाचे ग्रेनाईट आणण्यात आले आहे. या शुभारंभ कार्यक्रमा प्रसंगी ह.भ.प. संतोष महाराज चौधरी, ह.भ.प. कृष्णा महाराज वाघुले, ह.भ.प. श्याम महाराज यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मौलाना अहमद शेख व अश्पाकभाई शेख यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अश्पाकभाई शेख म्हणाले की, टाकळी भानच्या ग्रामस्थांसाठी शक्य होईल ते योगदान देत राहील सामाजिक कामाला माझा नेहमीच पाठिंबा राहील धर्मकार्यात तरुणांनी स्वतःला झोकून द्यावे व धर्माचे कार्य करावे असे उद्गार अश्पाकभाई शेख यांनी काढले पौरोहित्य सुदाम गुरु यांनी केले यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंडळाचे सेवेकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.ती अश्पाकभाई शेख यांच्याकडून मंदिरास ग्रेनाईट

 टाकळीभान प्रतिनिधी : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिराचे निर्माण कार्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व श्री क्षेत्र देवगड संस्थांनचे उत्तराधिकारी ह.भ.प. स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली सुरू असून या मंदिराचा ग्रेनाईट कामाचा शुभारंभ नूकताच ह.भ.प. संतोष महाराज चौधरी, ह.भ.प. कृष्णा महाराज वाघुले, मौलाना अहमद शेख, प्रसिद्ध उद्योगपती अशपाकभाई शेख यांच्याा शुभहस्ते करण्यात आला.
    मंदिर निर्माण कार्य हे अंतिम
टप्प्यात आले असून, प्रसिद्ध उद्योगपती अशपाकभाई शेख यांच्याकडे सेवेकरी मंडळींनी मंदिर निर्माण कार्यासाठी ग्रेनाईट ची मागणी केली असता त्याच क्षणी मंदिरास लागणारे संपूर्ण ग्रेनाईट देण्याचा शब्द अशपाकभाई शेख यांनी दिला होता. छत्रपती संभाजी नगर व नेवासा फाटा या ठिकाणावरून ३,३५,००० रुपयाचे ग्रेनाईट आणण्यात आले आहे. या शुभारंभ कार्यक्रमा प्रसंगी ह.भ.प. संतोष महाराज चौधरी, ह.भ.प. कृष्णा महाराज वाघुले, ह.भ.प. श्याम महाराज यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मौलाना अहमद शेख व अश्पाकभाई शेख यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अश्पाकभाई शेख म्हणाले की, टाकळी भानच्या ग्रामस्थांसाठी शक्य होईल ते योगदान देत राहील सामाजिक कामाला माझा नेहमीच पाठिंबा राहील धर्मकार्यात तरुणांनी स्वतःला झोकून द्यावे व धर्माचे कार्य करावे असे उद्गार अश्पाकभाई शेख यांनी काढले पौरोहित्य सुदाम गुरु यांनी केले यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंडळाचे सेवेकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments