अन्वी च्या चापे कुटुंबाने जपला आदर्श,व्यर्थ खर्चाला फाटा देत मुलाचा वाढदिवस दरवर्षी वृक्षारोपण करून करतात साजरा ---



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०१ - अन्वी येथील निसर्ग प्रेमी शिवानंद चापे व कोमल चापे हे दांपत्य दरवर्षी चि. अभिमन्यू चापे याचा वाढदिवस केक , फटाके, भेटवस्तू, फराळ , कपडे इत्यादी खर्च न करता वृक्षारोपण करून साजरा करतात.
 पहिल्या वाढदिवसाला एक , दुसऱ्या वाढदिवसाला २ असे वाढवत प्रत्येक वर्षानुसार आज पाचव्या वाढदिवसाला ५ कदंब, वड, इत्यादी पाच प्रजातीचे ५ वृक्ष अभिमन्यू शिकत असलेल्या गावातील सर्वज्ञ बालक मंदिर शाळेच्या आवारात रोपण करून उत्साहात साजरा केला. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. या उपक्रमाचे पोलिस अधिकारी उत्तम चापे, सूर्यकिरण अर्बन बँकेचे अध्यक्ष किरण पा. पवार यासह अनेकांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments