दरवर्षाप्रमाणे यावर्षीही वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भऊर येथून श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशा श्री रोकडेश्वर हनुमान महाराज पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी श्रीक्षेत्र भऊर येथून या पायी दिंडीचे प्रस्थान होणार आहे .अशी माहिती या दिंडीचे मार्गदर्शक हभप संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले की ,सालाबाद प्रमाणे या वर्षीही श्री रोकडेश्वर हनुमान महाराज यांच्या कृपेने तसेच सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, सद्गुरू संत श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व हभप संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रमोददादा जगताप यांच्या सहमार्गदर्शनाखाली हा पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र भऊर येथील श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिमेचे व रथाचे पूजन करून सकाळी नऊ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे. या दिंडी सोहळ्याचा पहिला मुक्काम निमगाव खैरी ,तालुका श्रीरामपूर येथे राहणार असून दुसरा 13 जुलै चा मुक्काम देवळाली तालुका राहुरी तर 14 जुलै 2026 रोजी धामोरी बु. (नांदगाव) तालुका राहुरी तसेच 15 जुलै रोजी वडगाव गुप्ता रोड , अहिल्यानगर येथे दिंडीचा मुक्काम राहणार आहे ,16 जुलै रोजी दहेगाव साकत ,17 जुलै रोजी थेरगाव तालुका कर्जत त्याचप्रमाणे 18 जुलै रोजी आनंदवाडी येथे दिंडीचा मुक्काम राहणार असून 19 जुलै रोजी करमाळा तर २० जुलै रोजी पांगरे तालुका माढा, 21 जुलै रोजी खटके वस्ती तालुका माढा येथे मुक्काम राहणार असून 22 जुलै रोजी भोसे येथे दिंडीचा मुक्काम असणार आहे. 23 जुलै रोजी हा दिंडी सोहळा विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर येथे पोहोचणार आहे. 23 ते 26 जुलै दरम्यान या दिंडी सोहळ्याचा मुक्काम श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणूनगर तालुका पंढरपूर येथे राहणार आहे. दरम्यान श्री रोकडेश्वर हनुमान महाराज पंढरपूर पायी दिंडी सोहळात सकाळी काकडा, दुपारी मुक्कामाचे ठिकाणी भजन, प्रवचन ,सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ, प्रवचन, कीर्तन ,आरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. 25 जुलै 2026 रोजी सायंकाळी सहा ते आठ यादरम्यान हभप संजयजी महाराज जगताप यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून 26 जुलै 2026 रोजी सकाळी नऊ ते 11 या दरम्यान हभप संजयजी महाराज जगताप यांचेच काल्याचे किर्तन होणार आहे .त्यानंतर महाप्रसाद अन्नदाते ॲड प्रमोद मुरलीधर जगताप त्यांच्याकडून महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. रस्त्यानेही ठिकठिकाणी अनेक अन्नदात्यांकडून चहा नाश्ता फराळ दुपारचे ,सायंकाळचे जेवण देण्यात येणार आहे. या सर्व अन्नदात्यांचे व दिंडीला सहकार्य करणाऱ्यांचे दिंडीचे मार्गदर्शक हभप संजयजी महाराज जगताप यांनी आभार मानले असून या दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी बिछाना सोबत घ्यावा.तसेच मौल्यवान वस्तू सोबत घेऊ नये. प्रवासामध्ये जीवित वा वित्त हानी झाल्यास त्यास ती व्यक्ती संपूर्णता जबाबदार राहील . सर्वांनी दिंडीचे नियम पाळावेत.तरी या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. असे आवाहन या पत्रकात हभप संजयजी महाराज जगताप (भऊरकर )यांनी केले आहे.
0 Comments