नासिक पुणे रेल्वेसाठी मी प्रवासी सेवा संस्थेबरोबर - पद्मश्री रघुवीर खेडकर


 
संगमनेर (प्रतिनिधी) प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी एखाद्या गावात प्रवासी सेवा संस्था स्थापन होणे हे तिथल्या सजगतेचे लक्षण आहे. या प्रवासी सेवा संस्थेने आता संगमनेर मार्गे नासिक पुणे रेल्वेसाठी आंदोलन उभे करावे मी सर्वांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होईल असे प्रतिपादन पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी केले.
येथील बस स्थानकावर संगमनेर प्रवासी सेवा संस्थेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. रघुवीर खेडकर यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक संतोष खेडलेकर, संगमनेर आगाराचे प्रमुख प्रशांत गुंड हे उपस्थित होते. डॉ. खेडलेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संगमनेरमध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुरु झाली या घटनेला एकशे एक वर्ष पूर्ण होत असताना निरपेक्ष भावनेने हा उपक्रम होतोय ही सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देणारी गोष्ट आहे. आगारप्रमुख गुंड यांनी भविष्यात प्रवाशांना येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
संस्थेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे उपाध्यक्ष संजय क्षत्रिय यांनी केले. 
  यावेळी कारभारी देव्हारे,नितीन मोहोळे, मुरतझा बोहरी, ॲड.राजू खरे,लहानु सदगीर,अजित मणियार,विवेक मुळे,सुरेश डग, प्रशांत धाडीवाल,सचिन गणोरे,अजित काढणे,रवींद्र नवले,विनोद गायकवाड,शांताराम आडेप,दिलीप गायकवाड,भाऊसाहेब वैद्य,सिमोन रुपटक्के,विशाल ढोरे तसेच शहरातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी लहानु सदगिर यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments