राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील मूळचे रहिवाशी व सध्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे नोकरीला असणारे
श्री.नारायण ऊर्फअनिल शंकर गुंजाळ हे श्रीमती. बबई ताई टाकळकर माध्यमिक आश्रम शाळा येथून तब्बल 33 वर्षाच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर नाईक या पदावरून मंगळवार दि. 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा शाळेमध्ये सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांना श्री. म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार श्री. सूर्यकांत पलांडे काका (शिरूर). तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सुदामराव चव्हाण. श्री. बाबा चौधरी. सचिव श्री .कांतीलाल टाकळकर मामा .व इतर पदाधिकारी व संचालक यांनी श्री. अनिल गुंजाळ यांना सेवापुर्तीच्या शुभेच्छा दिल्या तर माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री जमादार सर, प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.झेड .एस .पावर सर तसेच माध्यमिक शाळेचे शिक्षक श्री .चौगुले सर ,श्री. धाडस सर, सौ. मुळे मॅडम ,सौ. मलमे मॅडम , श्री . भागवत भाऊ, श्री.बोरकर भाऊ ,श्री. घुले भाऊ, व इतर शालेय कर्मचारी यांनी श्री.अनिल गुंजाळ यांना सेवापुर्तीच्या निमित्ताने पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनिल गुंजाळ यांनी येथे तेहतीस वर्ष प्रदीर्घ सेवा केली. अगदी प्रामाणिकपणे व शिस्तबद्ध आणि सर्वांशी मिळून मिसळून आपली नोकरी केली. त्यामुळे ते विद्यार्थी पालक, सर्व शिक्षक व ग्रामस्थांमध्येही लोकप्रिय होते. असे यावेळी सांगितले.तर सेवानिवृत्तीनंतर झालेल्या सत्कार प्रसंगी श्री .अनिल गुंजाळ यांनी अतिशय जड अंतकरणाने शुभेच्छांचा स्वीकार करून शिक्षक व विद्यार्थी , पालक,यांचे आभार मानले.व गेले तेहतीस वर्ष या शाळेमध्ये सेवा केली. शाळा एक परिवार समजून प्रामाणिक व मनोभावे नोकरी केली. आता सेवानिवृत्त होत असून माझ्या सेवाकाळात सर्वांनी मला सहकार्य केले.ते मी कधीही विसरणार नाही. या शाळेतील अनेक आठवणी कायम स्मरणात राहतील .असे त्यांनी वेळी सांगितले व परत एकदा सर्वांचे धन्यवाद मानले.
अनिल गुंजाळ हे मूळचे सावळीविहीर बुद्रुक तालुका राहता जिल्हा अ,नगर येथील रहिवाशी असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावळीविहीर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात झाले. त्यानंतर कोपरगाव येथे के.जे सोमैय्या कॉलेजमध्ये पदवीधर झाल्यानंतर ते आपल्या मामाच्या गावी निमगाव म्हाळुंगी येथे श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये नोकरीला लागले .तेथेच ते स्थायिक झाले .मात्र नोकरीला असतानाही त्यांनी आपल्या जन्मभूमी सावळीविहीरला कधी विसरले नाही. शाळेत असू कॉलेजला किंवा नोकरीला असो त्यांना सामाजिक कार्याची मोठी आवड असल्याने प्रत्येक सामाजिक कार्यात, उपक्रमात ते सहभागी होत असल्याने ते सर्वपरिचित असे व्यक्तिमत्व आहे. शाळेत असू की गावात दिलखुलास बोलणे वागणे ,राहणे, हा आपला, हा परका,असा मनात कधीही भेदभाव न ठेवणारे, सर्वांशी आपुलकीने वागणारे तसेच कामाशी काम करणारे आणि क्रीडा ,सांस्कृतिक ,सामाजिक त्याचप्रमाणे सार्वजनिक सण उत्सवांमध्ये नेहमी इंटरेस्टेड असणारे , नोकरी करत असताना शाळेप्रमाणेच आपल्या कुटुंब परिवाराकडे लक्ष देणारे, मुलांना सुसंस्कृत , सुशिक्षित बनवणारे अनिल गुंजाळ हे 30 जून 2026 रोजी आपल्या प्रदीर्घ तेहतीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत.
या काळात त्यांना पत्नीने व सर्व कुटुंबाने मोठी साथ दिली. त्यांचा मोठा कार्यकाळ निमगाव म्हाळुंगी या गावातच गेला. तत्पूर्वी सावळी विहीर बुद्रुक येथे ते होते. या दोन गावांमध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. या सर्वांकडून व नातेवाईक, शिक्षक, पालक विद्यार्थी यांच्याकडूनही अनिल गुंजाळ यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा देण्यात येत असून त्यांना पुढील आयुष्य सुख-समृद्धीचे , उत्तम आरोग्याचे जावो अशी प्रार्थना करण्यात येत आहे. अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून, भ्रमणध्वनीद्वारे, सोशल मीडियावर सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments