सावळीविहीरच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न!

शिर्डी (प्रतिनिधी)-राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय गणवेश व शालेय साहित्य मोफत वाटप कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश कापसे, गणेश आगलावे, नाना कदम, किरण आगलावे,स्वप्निल पारडे, सचिन भैरवकर, एकनाथ आरणे, पत्रकार राजकुमार गडकरी, राजेंद्र दुनबळे, रतन गायकवाड, अशोक तुळशीराम कराडे, आदी मान्यवर उपस्थित होते. 
  या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी यावर्षी ---आदी देणगीदारांनी शैक्षणिक साहित्य दिले. त्यांचे यावेळी आभार मानण्यात आले. 
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर बाळासाहेब जपे यांनी बोलताना सांगितले की, रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर अण्णांची संस्था असून येथे न्यू इंग्लिश स्कूल ही रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे.या शाळा निर्मितीसाठी स्वर्गीय शंकरराव काळे साहेब यांचेही मोलाचे सहकार्य लाभले होते. इथे सर्व समावेशक शिक्षण दिले जात असून चांगल्या प्रकारे गुणवंत विद्यार्थी घडविले जातात. या शाळेचे सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात मोठे नाव आहे. शाळेची टक्केवारी ही चांगली आहे. त्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश घ्यावा. असे आवाहन करत या शाळेला शिक्षण प्रेमी नागरिक, माजी विद्यार्थी तसेच देणगीदारांनी गरीब व हुशार विद्यार्थींच्या मदतीसाठी आप आपल्या परीने हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments